महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
आपली सेवा, आमची जबाबदारी
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ दिनांक २८ एप्रिल २०१५ रोजी लागू करण्यात आला असून, याचा उद्देश नागरिकांना शासकीय विभागांकडून जाहीर केलेल्या सेवा पारदर्शक, वेळेत व उत्तरदायित्वाने प्राप्त होण्यासाठी सुनिश्चित करणे आहे. या अधिनियमानुसार, पशुसंवर्धन विभाग आपल्या सेवा कार्यक्षमतेने आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्वाने प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे.
या अधिनियमाअंतर्गत मिळणाऱ्या सेवा, त्यांची माहिती आणि अर्ज भरण्यासाठी नागरिक ‘आपले सरकार’ वेब पोर्टल वापरू शकतात. या पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज सुलभतेने करता येतात.
सेवा देण्यास विलंब झाल्यास किंवा कोणतीही वैध कारणे नसताना सेवा नाकारल्यास, नागरिकांना अपील करण्याचा हक्क आहे. प्रथम व द्वितीय अपील संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करता येते आणि आवश्यक असल्यास तृतीय व अंतिम अपील आयोगाकडे दाखल करता येते.
पशुसंवर्धन विभागाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत खालील सेवा अधिसूचित केल्या आहेत, जेणेकरून त्या सेवा नागरिकांना वेळेत, पारदर्शकतेने व उत्तरदायित्वाने मिळतील.
अ. क्र. | सेवेचे नाव | दुवा |
---|---|---|
१ | कुक्कुट प्रक्षेत्राची कमपार्टमेंट चाचणी | आपले सरकार |
२ | कुक्कुट प्रक्षेत्रावरून SPF अंडी निर्यातीकरिता प्रमाणपत्र देणे | आपले सरकार |
३ | पशुखाद्यातील पोषक घटकांचे स्थूल विश्लेषण (Proximate Analysis) 1 ते ६ Parameter | आपले सरकार |
४ | पशुखाद्यातील स्थूल घटक १ ते ६ पेरामीटर सहित केल्शियम, स्फुरद व मीठ (सोडियम) १ ते ९ Parameter | आपले सरकार |
५ | पशुखाद्यातील सूक्ष्मपोषण द्रव्ये व जड धातू (Micronutrients and heavy metals) | आपले सरकार |
६ | पशुखाद्यातील तंतू (Crude fibers, NDF, ADF and ADL) | आपले सरकार |
७ | पशुखाद्यातील युरिया | आपले सरकार |
८ | पशुखाद्यातील ऊर्जा | आपले सरकार |
९ | भारतीय पशुवैद्यकीय परिषद कायदा, १९८४ अन्वये नवीन पशुवैद्यकीय पदवीधरांचे नोंदणी करणे | आपले सरकार |
१० | भारतीय पशुवैद्यकीय परिषद कायदा, १९८४ अन्वये नोंदणीकृत पशुवैद्यकांच्या पाच वर्षानंतर नोंदणीचे नुतनीकरण | आपले सरकार |
११ | भारतीय पशुवैद्यकीय परिषद कायदा, १९८४ अन्वये अंतरवासिता विद्यार्थी यांची नोंदणी करणे | आपले सरकार |
१२ |
पाळीव प्राणी दुकाने नोंदणी १. तात्पुरते प्रमाणपत्र वैधता ३ महिने २. अंतिम प्रमाणपत्र वैधता ५ वर्ष |
आपले सरकार |
१३ | श्वान प्रजनन व विपणन केंद्र नोंदणी प्रमाणपत्र वैधता २ वर्ष | आपले सरकार |
१४ | चारा पिकांचे ठोंबे पुरवठा | आपले सरकार |
१५ | पशुखाद्य व कुक्कुट खाद्यातील बुरशी तपासणी | आपले सरकार |
१६ | निर्यातीकरिता जनावरांना देण्यात येणारे आरोग्य दाखले | काम चालू आहे |
१७ | निर्यातीकरिता मांस व मांस उत्पादने तपासणी दाखले | आपले सरकार |
१८ | निर्यातीकरिता मांस व मांस उत्पादने यांची रासायनिक तपासणी | आपले सरकार |