बंद

    महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरण

    राज्यामध्ये रेत उत्पादनासाठी प्रजननक्षम वळूंचा वापर,गोजातीय रेत संस्करण,साठवण,विक्री,व वितरण,गोजातीमध्ये सहयोगी जनन तंत्रज्ञानसह कृत्रिम रेतन करणे या सारख्या गोजातीय प्रजनन क्रियांचे विनियमन करून त्या द्वारे गोजातीय मध्ये सुधारणा करण्यासाठी “महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, २०२३” हा कायदा राज्यात लागू करण्यात आला आहे.  सदर कायदयाची अंबलबजावणी ०५ डिसेंबर २०२४ पासून करण्यात येत आहे.

    या कायदयाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत –

    (क) गोजातीय प्रजनन क्रियांचे विनियमन करणे;
    (ख) रेत केंद्र, भ्रूण प्रत्यारोपण, प्रयोगनलिका (in-vitro) फलन प्रयोगशाळा, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था, सहयोगी जनन तंत्रज्ञान सेवा यांची प्राधिकरणाकडे नोंदणी करणे तसेच रेत बैंक, कृत्रिम रेतन सेवा पुरवठाकार, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांची जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्ताकडे नोंदणी करणे.
    (घ) वळू प्रमाणित करणे.
    (ङ) महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाची स्थापना करणे.
    (च) प्राधिकरणाद्वारे निरीक्षण, झडती व जप्ती करण्याचा अधिकार.
    (छ) या अधिनियमाच्या तरतुदीचे उल्लंघन केल्याबद्दल शास्ती.

    महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम 2023   महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) नियम

    • टेलिफोन : 0000000000
    • ईमेल : mahabbra[at]gmail[dot]com
    • पत्ता : आयुक्त पशुसंवर्धन कार्यालय, महाराष्ट्र राज्य, औंध , पुणे ४११०६७