बंद

    उत्पादक भागीदारी उपप्रकल्प

    • तारीख : 15/12/2020 -

    प्रकल्पाचे नाव : मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प

    योजनेचे नाव : उत्पादक भागीदारी उपप्रकल्प

    (खरेदीदार आणि शेतक-यांच्या संस्था यांच्यातील भागीदारी उपप्रकल्प)

    योजना सुरु : १५ डिसेंबर २०२०

    योजना समाप्ती : —-

    तारीख :

    क्षेत्र :

    शेळी, शेळीचे मांस व शेळीचे दूध आणि परसातील कुक्कुट पालनाद्वारे उत्पादित अंडी या क्षेत्रात पशुसंवर्धन विषयक मूल्य साखळी विकसीत करणे.

    लाभार्थी :

    शेतकरी उत्पादक कंपनी

    लाभ :

    शेतकरी उत्पादक कंपनीने ज्या खरेदीदाराबरोबर करार केला आहे, त्या खरेदीदाराच्या खरेदीचे निकष पूर्ण करण्यासाठी आवश्यक अशा गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी स्मार्ट प्रकल्पातून ६० टक्के अनुदान मिळेल.उदा.- शेडचे बांधकाम, शेळ्याचे टॅगिंग, सभासदाकडून शेळ्या गोळा करण्यासाठी/ अंडी गोळा करण्यासाठी वाहन, वैरणीसाठी बेलर मशीन, उपकरणे ईत्यादी पायाभूत सुविधा साठी अनुदान मिळेल.

    अर्ज कसा करावा :

    1. शेतकरी उत्पादक कंपनी कायदेशीरित्या नोंदणीकृत असावी.
    2. संस्थेचे सनदी लेखापालाव्दारे (सीए) लेखापरीक्षण केलेले असावे.
    3. शेतकरी उत्पादक कंपनीचे किमान २५० भागधारक / सदस्य असणे आवश्यक आहे.
    4. (शेतकरी उत्पादक कंपनीच्या भागधारकांची नोंदणी कंपनी निबंधकाकडे – रजिस्ट्रार ऑफ कंपनीज-आरओसी झालेली असावी)

    5. संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालात लक्षणीय लेखाआक्षेप नसावेत. संस्था कोणत्याही कर्जाची थकबाकीदार नसावी.
    6. मागील ३ वर्षापैकी एका वर्षात किमान रुपये ५.०० लाखापेक्षा जास्त उलाढाल सनदी लेखापालाच्या (सीए) लेखापरीक्षण अहवालात असावी.
    7. खरेदीदाराबरोबर सामंजस्य करार केलेला असला पाहिजे.
    8. हे निकषपुर्ती करणाऱ्या संस्थेने उपरोक्त कागदपत्रे संबधित जिल्ह्याच्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात सादर करावेत.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे