बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प
प्रकल्पाचे नाव : मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प
योजनेचे नाव : बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प
(बाजारपेठेच्या संपर्क वाढीसाठी शेतक-यांच्या संस्थांना सहाय्य)
योजना सुरु :
१५ डिसेंबर २०२०
योजना समाप्ती :
—-
तारीख :
क्षेत्र :
शेळी, शेळीचे मांस व शेळीचे दूध आणि परसातील कुक्कुट पालनाद्वारे उत्पादित अंडी या क्षेत्रात पशुसंवर्धन विषयक मूल्य साखळी विकसीत करणे.
अर्ज कसा करावा :
- शेतकरी उत्पादक कंपनी कायदेशीरित्या नोंदणीकृत असावी.
- संस्थेचे सनदी लेखापालाव्दारे (सीए) लेखापरीक्षण केलेले असावे.
- शेतकरी उत्पादक कंपनीचे किमान ७५० भागधारक / सदस्य असणे आवश्यक आहे.
- संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालात लक्षणीय लेखाआक्षेप नसावेत. संस्था कोणत्याही कर्जाची थकबाकीदार नसावी.
- मागील ३ वर्षापैकी एका वर्षात किमान रुपये २५.०० लाखापेक्षा जास्त उलाढाल सनदी लेखापालाच्या (सीए) लेखापरीक्षण अहवालात असावी.
- संस्थेचे दोन वार्षिक सर्वसाधारण सभेचे इत्तिवृत्त सादर करावे.
(शेतकरी उत्पादक कंपनीच्या भागधारकांची नोंदणी कंपनी निबंधकाकडे – रजिस्ट्रार ऑफ कंपनीज-आरओसी झालेली असावी)
हे निकषपुर्ती करणाऱ्या संस्थेने उपरोक्त कागदपत्रे संबधित जिल्ह्याच्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात सादर करावेत.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे