महाराष्ट्र गोसेवा आयोग
राज्यात महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम 2023 मंजुर झालेला असुन दि.27/04/2023 रोजी तो शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेला आहे.
गोसेवा आयोगाची प्रमुख उदिष्टे :-
- महाराष्ट्र राज्यामध्ये पशुंचे संवर्धन संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणा-या संस्थांचे पर्यवेक्षण करणे.
- पशु प्रजननाचे आणि स्थानिक जातीचे संवर्धन अनुवंशिक सुधारणा, वैरण विकास यामध्ये कार्यरत असलेल्या गोसदन, गोशाळा पांजरपोळ, गोरक्षण संस्था इत्यादी संस्थांना उत्तेजन देणे.
- पशु आरोग्य सेवांचे प्रचलन, देशी पशुंचे सर्वधन व विकास गोवंश प्रजनन धोरणाची अमलबजावणी, वैरण विकास अनुषंगाने कार्य
- प्राणी क्लेष प्रतिबंध सोसायटी कामकाजाचा आढावा घेणे.
आयोगाची रचना :-
- आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन दर्जाचा अधिकारी सदस्य सचिव
- आयोगावर 14 पदसिध्द सदस्य यामध्ये आयुक्त पशुसंवर्धन पदसिध्द सदस्य
- आयोगावर 9 अशासकीय व्यक्ती नामनिर्देशनाने सदस्य
- अशासकीय सदस्यापैकी एक सदस्याची अध्यक्ष्ाे म्हणुन निवड अपेक्षित.
आयोगाच्या मुख्यालयासाठी मुंबई महानंदा डेअरी परिसरातील जागा प्रस्तावित.
आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयाकडुन सादर केलेले प्रस्ताव :-
- लेखाशीर्ष निमिर्ती अनुषंगाने प्रस्ताव शासनास सादर.
- आयोगासाठीच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनास सादर.
- गोसेवा आयोग अधिनियमा अंतर्गत 26 (1) कलमानुसार नियम करण्याचा अधिकार शासनास त्याअनुषंगाने प्रारूप नियम शासनास सादर.
प्रारूप नियमांच्या अनुषंगाने नियम तयार पडताळणी करण्यासाठी समिती गठीत.