बंद

    पशुसंवर्धन विभागाची पंचसूत्री

    पशुसंवर्धन विभागामध्ये काम करतांना १) पशुपैदास सुधारणा (ब्रीडिंग) २) पशुधनाचे आरोग्य (ऍनिमल हेलथ) ३) वैरण विकास (फॉडर), 4) पशुखाद्य (फीड) आणि ५) पशुधनाचे व्यवस्थापन (मॅनेजमेंट) ही पंचसुत्री अमलात आणण्यात येत आहे.

    • पशुपैदास सुधारणा (ब्रीडिंग): या कार्यक्रमामध्ये अनुवांशिक सुधारणा व नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून उच्च गुणावत्ता व उत्पादकता असलेल्या पशूंची निर्मिती व त्यांच्या नवीन जातींची ओळख करून त्यांची उत्पादकता वाढविणे.
    • पशुधनाचे आरोग्य (ऍनिमल हेलथ ): यामध्ये प्रतिबंधात्मक (प्रेसेंटेटिव्ह), प्रवर्तक (प्रोमोटिव्ह), उपचारात्मक (क्युरेटिव्ह ) उपाययोजना करून पशुउद्योजकांना गुणवत्तापूर्ण पशुवैद्यकीय सेवा देणे.
    • वैरण विकास (फॉडर): उच्च पोषणमूल्य असलेल्या पौष्टिक वैरणीची निर्मिती करणे, मुरघास, वैराणीच्या विटा, अशा स्वरूपाच्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे.
    • पशुखाद्य (फीड): उच्च पोषणमूल्य असलेल्या व पौष्टिक पशुखाद्याचा उत्पादनास व वापरास प्रोत्साहन देणे.
    • पशुधनाचे व्यवस्थापन (मॅनेजमेंट): पशु व्यवस्थापनाच्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करणे व त्यास चालना देणे.