बंद

    व्हिजन मिशन उद्दिष्ट्ये व कार्ये

    व्हिजन:

    पशुसंवर्धनाच्या सुधारित तंत्रज्ञानाद्वारे राज्यामध्ये आर्थिक व पोषणविषयक विकासाची शाश्वती देणे.

    मिशन:

    राज्यातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पशुजन्य पदार्थांची उदा. दूध, अंडी व मांस यांची मागणी व उपलब्धता यात असलेली तफावत दूर करणे व त्याचे माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करून ग्रामीण भागातील बेरोजगारी दूर करणे.

    उद्दिष्टे व कार्ये

    राज्यासाठी पशुधन धोरण तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन या विभागाचे प्रमुख कार्य आहे. विभागातंर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्था आणि पदाधिकारी यांच्या माध्यमातून योजना आणि योजनेत्तर निधीमधून विविध विकासविषयक योजनांची अमलबजावणी करून हे कार्य पार पाडण्यात येते.
    विभागाच्या प्रमुख कार्यांमध्ये खालील महत्त्वाच्या बाबींचा समावेश होतो:-

    • पशुपैदास धोरणांची प्रभावी अंमलबजावणी – कृत्रिम रेतनाव्दारे पशुधनामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून उत्पादकता वाढविणे.
    • पशुधनाचे रोगराईपासून संरक्षण करुन जास्त दुध उत्पादन, अंडी उत्पादन, मांस, लोकर ही पशुजन्य उत्पादने वाढविणे.
    • ग्रामीण शेतकरी व गरजू लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे, शेळी गट, कुक्कुट पक्षी वाटप करुन पुरक उत्पन्नाचे व स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देणे.
    • पशुधनास लागणाऱ्या वैरण व पशुखाद्याची उपलब्धता वाढविणे.
    • पशुधनास लागणाऱ्या लसींची निर्मिती करणे.
    • प्रसिध्दी व प्रचार कार्यक्रमाअंतर्गत पशुपालकांपर्यंत पशुसंवर्धन विषयक योजनांची माहिती पुरविणे. तसेच राज्य प्रशिक्षण धोरणाची अंमलबजावणी करणे.
    • पशुसंवर्धन विषयक सेवा व प्रशासकीय सेवा आधुनिक व गतीमान करणेसाठी आवश्यक मनुष्यबळ व पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देणे.