गुण नियंत्रण प्रयोगशाळा
महाराष्ट्र शासनाने खात्याच्या १९८४ च्या पुनर्रचनेत पूर्वीची पशुपोषण संशोधन केंद्र व गुणनियंत्रण प्रयोगशाळा आरे, गोरेगांव (पुर्व) मुंबई ६५ या संस्थाचे जोड योजनेद्वारे एकत्रीकरण करून गुणनियंत्रण प्रयोग शाळा, आरे परिसर, गोरेगांव (पूर्व) मुंबई ६५ ही संस्था कार्यरत करण्यात आली आहे. उपआयुक्त पशुसंवर्धन गुणनियंत्रण प्रयोगशाळा यांना या संस्थेचे कार्यालयप्रमुख म्हणून घोषित केले आहे.
संस्थेमार्फत करण्यात येणारे कामकाज.
महाराष्ट्र शासन निर्णय क्र. आस्था / २०७५/६५३५/एडिएम/दि. १४.०४.१९७७ अन्वये परदेशी निर्यात करण्यापूर्वी पशुजन्य पदार्थाच्या गुणवत्ता चाचणीसाठी परोपजीवी, सुक्ष्मजीवी व जैविक तपासणीचे काम गुणनियंत्रण प्रयोग शाळा, आरे, गोरेगांव (पुर्व) मुंबई ६५ या ठिकाणी करण्यात येत आहे. निर्यात करण्यात येणाऱ्या पशुजन्य पदार्थांमध्ये म्हशीचे गोठित मांस, शेळी, मेंढीचेमांस,शवे,उबवणुकीची व खाण्याची अंडी तसेच इतर पशुजन्य खाद्यपदार्थाचे नमुने ह्या बाबींचा समावेश होतो. तसेच, केंद्र शासनाच्या धोरणानुसार डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स यांची अधिसुचना क्रमांक/इटीसी (पीन)९२/१७, दिनांक ३१.०३.१९९३ नुसार मांस व पशुजन्य पदार्थांच्या चाचण्या घेऊन दाखले देण्याबाबत धोरण निश्चित केले आहे. सदर दाखले देण्याचे काम देखील या संस्थेमार्फत केले जाते. शासन निर्णय संकीर्ण/१०/२००२/प्र.क्र.४१/कृषी पदुम/मंत्रालय दि. २२.०१.२००३ अन्वये मानवी खाद्यासाठी उपयोगात न येणाऱ्या पशुजन्य व अखाद्य (नॉनइडिबल) उत्पादित पदार्थाच्या नमुना तपासणीचे काम देखील गुणनियंत्रण प्रयोगशाळा आरे गोरेगांव (पूर्व) मुंबई ६५ यांच्याकडे वर्ग करण्यात आले. हे काम पूर्वी मुंबई पशुवैद्यकिय महाविद्यालयाकडे होते. घातक रोग देशात येऊ नयेत म्हणून आयात केलेले पशु व पशुजन्य पदार्थांचे जिवाणू, विषाणु परिक्षण, जंत व कृमी परिक्षण इ. कामे करणे गरजेचे आहे. यासाठी राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ व बंदरे या ठिकाणी आयात झालेल्या पशु व पशुजन्य पदार्थाचे नमुने संकलित करून त्याची तपासणी करण्याचे अधिकार शासन निर्णय क्र.डि.आय.एस १०/२००१ / २१४१३/प्र.क्र / २१८/पदुम मंत्रालय दि. ०९.०८.२००१ अन्वये गुणनियंत्रण प्रयोग शाळा आरे गोरेगांव (पुर्व) मुंबई ६५ या संस्थेस प्रदान करण्यात आले आहेत.
कार्यपद्धती-
निर्यातदारांचे अर्ज कार्यालयात प्राप्त झाल्यानंतर अर्जाप्रमाणे गोठीत मासाचे नमुने, संकीर्ण, अखाद्य पदार्थ, अंडी असेवर्गीकरण करतात. तसेच कार्टन संख्या, कार्टनचे सरासरी वजन, माल कोणत्या देशात निर्यात होणार इत्यादी माहिती अर्जात आहे किंवा नाही याबाबत खात्री केली जाते. गोठीत मांसाच्या नमुने संदर्भात अर्जा सोबतची इतर कागदपत्रे तपासून परत केली जातात. अर्ज तपासणी नंतर उपआयुक्त पशुसंवर्धन गुणनियंत्रण प्रयोगशाळा, आरे, गोरेगांव यांच्या आदेशानुसार पशुधन विकास अधिकारी हे निर्यातदाराच्या कंपनीस भेट देऊन प्रत्यक्ष भेटीत शीतगृहाचे तापमान पाहणे, प्रोसेसिंग प्लांटची स्वच्छता व प्रक्रीया पाहणे, कार्टन क्रमांक व पॅकींग, मालाचा साठा इत्यादी बाबीची पहाणी व मार्गदर्शन इत्यादी कामे करतात. त्यानंतर रॅन्डम पध्दतीने कार्टनचे नमुने गोळा करुन परोपजीवी, सुक्ष्मजीवी व जैविक तपासणी करीता गुणनियंत्रण प्रयोग शाळा आरे गोरेगांव येथे आणले जातात व त्यानंतर नमुन्यांची (१) परोपजीवी चाचणी (२) सुक्ष्मजीव तपासणी (३) जैवीक तपासणी केली जाते. तपासणीमध्ये प्रमाणकात दर्शविल्याप्रमाणे खात्री करुनच निर्यातक्षम मांस व पशुजन्य पदार्थ निर्यातीसाठी योग्य असल्याचा दाखला गुणनियंत्रण प्रयोगशाळा यांचे कडुन दिला जातो.