बंद

    पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध

    • पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे-७ ही राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पाळीव प्राणी व पक्षी यांच्या साठी रोग प्रतिबंधात्मक लसीचे उत्पादन करणारी एकमेव राज्यस्तरीय संस्था आहे.
    • ही संस्था सन १९६० पासून पुण्यातील औंध भागात कार्यरत आहे. संस्थेत पाळीव प्राणी व पक्षी यांना लागणाऱ्या जिवाणू लसी, विषाणू लसी, अभिकारके व द्रावणे तयार केली जातात. या लसी राज्यभरातील सर्व पशुवैद्यकीय संस्थाना, शेतकऱ्यांच्या व पशुपालकांच्या पशुधनास लसीकरण करण्यासाठी मोफत तत्वावर पुरवठा करण्यात येतात.
    • या संस्थेमध्ये निर्माण होणाऱ्या लसी सर्व राज्यस्तरीय आणि जिल्हा परिषद पशुवैद्यकीय संस्थाना विनामूल्य पुरविल्या जातात.

    या संस्थेचे नियमन खालील कायद्यानुसार केले जातात.

    पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था
    • औषधे व प्रसाधने कायदा, १९४० व १९४५ (सुधारित)
    • कारखाना कायदा, १९४८
    • बॉयलर, स्मोक अँड न्युसन्स अॅक्ट १९१२.
    • पेट्रोलियम अॅक्ट, १९३४
    • बॉम्बे लेबर वेलफेअर फंड अॅक्ट, १९७७.
    • केंद्रीय विक्रीकर ( नोंदणी व उलाढाल) नियम, १९५७.
    • एनव्हायरॉनमेंट प्रोटेक्शन अॅक्ट अंतर्गत बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रुल्स, १९९८.
    • सीसीएसईए – (प्राण्यांवरील प्रयोगाच्या नियंत्रण आणि पर्यवेक्षणासाठी समिती, भारत सरकार) प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा-1960, प्राण्यांवर प्रजनन आणि प्रयोग (नियंत्रण आणि पर्यवेक्षण) नियम 1998.

    सर्व लसीचे उत्पादन औषधी व प्रसाधने कायदा -१९४५ च्या शेड्यूल-एम मध्ये विहित केलेल्या शर्तीस अधीन राहून करण्यात येत असल्याने लस उत्पादन झाल्यानंतर त्या वितरण करण्यापूर्वी त्यांच्या सर्व प्रकारच्या चाचण्या काटेकोरपणे चाचणी व गुणवत्ता प्रयोगशाळेत करण्यात येतात. या शास्त्रशुद्ध आणि सुसूत्रताबद्ध कार्यपद्धतीमुळे ही संस्था देशातील नामवंत संस्थामध्ये गणली जाते.

    व्हीजन :

    पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था
    महाराष्ट्र राज्यास पशुधन लस उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण करणे.

    उद्देश/मिशन:

    राज्यातील पशुपालकांना दर्जेदार पशुवैद्यकीय जैविक उत्पादने उपलब्ध करून देणे तसेच राज्यातील पशुधन रोग मुक्त ठेवुन पशुधन व कुक्कुट यापासुन दुग्ध, मांस व अंडी यांच्या उत्पादनात वृद्धी करणे व याद्वारे पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ करणे.

    जिवाणू लस उत्पादन विभाग

    • सध्या या संस्थेने जिवाणू लस उत्पादनासाठी सन २०१४ पासून फरमेन्टर तंत्रज्ञान अवलंबिले असून आदर्श उत्पादन पद्धतीच्या मानकानुसार लस उत्पादनाची कार्यवाही नियमितपणे सुरू केली आहे.
    • या फरमेन्टर तंत्रज्ञान पद्धतीने एक वेळी फक्त एक (मोहिमेचा आधार) जिवाणू लस उत्पादनाचे कार्य असे वर्षातून घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार या लसीचे उत्पादन सोबत सालमोनेला कलर अॅंटीजन या अभिकारकाचे उत्पादन सुरळीतपणे सुरू आहे.
    • उत्पादित लस मात्रांचा क्षेत्रीयस्तरावर आवश्यकतेनुसार पुरवठा केला जातो. सद्य स्थितीमध्ये संस्थेत जिवाणू लस उत्पादनाचे कार्य अविरतपणे चालू आहे.
    • जिवाणू लस उत्पादनाच्या कार्यामध्ये पूर्वी एका जिवाणू लसीच्या गटामध्ये ५०००० मात्रा तयार होत होत्या. परंतू फरमेंटर तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे एका लस गटामध्ये ७५०००० अशा मात्रा तयार होत आहेत. सध्या या प्रकल्पाची जिवाणू लसींच्या उत्पादनाची क्षमता ही सरासरी १ कोटी मात्रा एवढी आहे.
    • तसेच या तंत्रज्ञानामुळे लसीचा जनावरांमधील डोस हा पूर्वीच्या ५ मि.ली. वरुन २ मि.ली असा झालेला आहे.

    कुक्कुट व विषाणू लस उत्पादन विभाग

    पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था

    • सदरचा विभागाचे लस उत्पादन हे सन 2009 पासून आदर्श उत्पादन पध्दतीच्या मानकांचा अवलंब न केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने या लस उत्पादनास स्थगिती दिली होती.
    • त्यानंतर या लसींचे उत्पादन सुरळीत होण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत रु.५०.४३ व रु.११.२५ असा एकूण रु. ६१.६८ कोटीचा अद्यावत प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांतर्गत दोन वेगवेगळ्या इमारतीमध्ये कुक्कुट लस तसेच विषाणू लस उत्पादनाचे कार्य सुरु करण्यात आलेले आहे.
    • या प्रकल्पामध्ये संपूर्णत: आदर्श उत्पादन पध्दतीच्या मानकांचा अवलंब करण्यांत आलेला असून फलीत अंडयांची निवड करण्यापासून ते अंतिम उत्पादन होईपर्यन्त तंत्रशुध्द व अर्धस्वंयचलीत संयंत्रांचा वापर करण्यांत आलेला आहे.
    • या प्रकल्पामुळे कुक्कुट व विषाणू लसींच्या उत्पादनामधील पूर्वीच्या तुलनेत 5 पटीने (म्हणजेच 12.50 कोटी लसमात्रा) वाढ झाली आहे.

    लघुप्राणी विभाग

    • लघुप्राणी विभागामधे प्रयोगशालेय प्राणी (पांढरे उंदीर, ससे व गिनी पिग) यांचे उत्पादन व संगोपन केले जाते.
    • लघुप्राणी विभाग लस उत्पादनआणि चाचणी व गुणनियंत्रण प्रक्रियेत आवश्यक असणारे प्रयोगशालेय प्राणी (पांढरे उंदिर, ससे व गिनी पिग) तसेच मोठे प्रयोगशालेय प्राणी (रेडा, शेळ्या, मेंढ्या), कुकुट पक्षी व एस पी एफ़ अंडी इत्यादी चा मागणीनुसार पुरवठा करतो. तसेच विभागाकडे सीसीएसईए चा लहान प्रयोगशालेय प्राणी यांचा विक्रीचा परवाना उपलब्ध आहे. त्यानुसार आयव्हीबीपी, डीआयएस च्या वापराव्यतिरिक्त अतिरिक्त प्रयोगशालेय प्राणी यांची सीसीएसईए नोंदणीक्रुत संस्थांना विक्री केली जाते.

    • लघुप्राणी विभाग संस्थात्मक प्राणी नीतिशास्त्र समिती, सीसीएसईए च्या नियंत्रणाखाली कार्यरत असुन विविध लस निर्मिती मधे आवश्यक असलेले प्रयोगशालेय प्राण्यांचे वापराकरिता प्रोटोकॉल हे संस्थात्मक प्राणी नीतिशास्त्र समिती कडुन मंजुर केले जातात.
    • लस उत्पादनआणि चाचणी व गुणनियंत्रण प्रक्रियेत आवश्यक असणारे मोठी जनावरे (रेडा, शेळ्या, मेंढ्या) हेमहाराष्ट्र पशुधन विकास मंडळ,यांचेप्रक्षेत्रावरुन प्राप्त करुन प्रयोगाअंती परत सदर प्रक्षेत्रावर पुनर्वसन केले जाते.

    चाचणी आणि गुणवत्ता नियंत्रण विभाग

    या प्रयोगशाळेमध्ये लस उत्पादनासाठी खरेदी करण्यात येत असलेले मिडिया, रसायने व इतर साहित्यांची चाचणी व गुणवत्ता दर्जा तसेच लस उत्पादन झाल्यानंतर वितरण पुर्व लसींची चाचणी व गुणवत्ता दर्जा तपासण्यात येतो.

    या संस्थेमध्ये खालीलप्रमाणे लसींचे उत्पादन केले जाते.
    अनु क्रमांक उत्पादन करण्यात येत असणाऱ्या लसींची नावे
    1 घटसर्प
    2 फऱ्या
    3 आंत्रविषार
    4 मानमोडी
    5 लासोटा
    6 कोंबडयाची देवी
    7 मरेक्स
    8 पीपीआर
    9 शीप पॉक्स
    10 सल्मोनेल्ला रंगीत अँटीजन
    11 कॅलिफोर्निया स्तनदाह चाचणी

    पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थापशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थापशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थापशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था

                                       

    • टेलिफोन : 020-25695632
    • ईमेल : jcivbp-mh[at]gov[dot]in
    • पत्ता : पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध