बंद

    भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी पश्चिम विभागीय संदर्भिय पशुरोग निदान प्रयोगशाळा रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे

    प्रयोगशाळापशुआरोग्य हा पशुपालन व्यवसायाचा मुख्य कणा आहे. पशुआरोग्य अबाधित राखणे, पशुधनातील रोगनिदान करणे, क्षेत्रिय अधिका-यांना रोग प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी औषधोपचार, नियंत्रण व निवारणात्मक उपाययोजनाकरिता मार्गदर्शन करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

    पशुधनातील प्रादुर्भावामुळे पशुपालक व्यावसायिक संस्था व शेंतक-यांचे गुरांमधील मर्तुक आणि त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने आर्थिक नुकसान होते. राष्ट्रीय कृषि आयोगाने देखील पशुधन क्षेत्राच्या वाढीसाठी प्रामुख्याने गुरांच्या सांसर्गिक रोगांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

    पशुरोग अन्वेषण विभागाची उद्दिष्टे

    प्रयोगशाळा

      • रोग प्रादुर्भावातील आजारी, मृत गुरांच्या उती नमुन्यांचे संकलन करणे.
      • उती नमुन्यांचे अन्वेषण करुन आजारी, मृत गुरांच्या रोगाचे पक्के निदान करणे.
      • पशुधनातील व कुक्कुट पक्ष्यातील रोग प्रादुर्भावांची निश्चिती करणे.
      • क्षेत्रिय अधिका-यांना रोग प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी औषधोपचार, नियंत्रण व निवारणात्मक उपाययोजनांचे मार्गदर्शन करणे.
      • पशुधनातील व कुक्कुट पक्ष्यातील विषबाधा निदानासाठी चाचण्या करुन मर्तुक आटोक्यात आणण्यासाठी औषधोपचार, नियंत्रण व निवारणात्मक उपाययोजना सुचविणे.
      • राज्यातील ज्ञात व अज्ञात रोगांचे अन्वेषण करणे.
      • पशुधनातील क्षय, जोन्स, लैंगिक सांसर्गिक रोग व गर्भपात तसेच कुक्कुट पक्ष्यातील साल्मोनेल्लोसीस या मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान करणा-या महत्त्वाच्या रोगांच्या नियंत्रणासाठी चाचण्या करणे.
      • राज्य व राज्याबाहेरील पशुरोगनिदान प्रयोगशाळामधील अधिका-यांसाठी रोगनिदानासंबंधी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करणे.
      • राज्यातील आयबीआर, पीपीआर, लैंगिक सांसर्गिक रोग व गर्भपात व इतर रोगांचे सर्वेक्षण करणे.
      • रोग प्रादुर्भावासंबंधीचे अन्वेषण आणि झालेल्या आर्थिक नुकसानीसंदर्भातील सर्वेक्षणाची माहिती घेणे.

    प्रयोगशाळा

    कार्ये

    पश्चिम विभागीय संदर्भ प्रयोगशाळा स्थापना

    भारत सरकार, नवी दिल्ली यांनी रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे-7 या संस्थेस पश्चिम विभागीय संपर्क प्रयोगशाळेचा दर्जा (डब्लु.आर.डी.डी.एल.) केंद्र शासनाने प्रदान केला आहे. या दर्जानुसार या संस्थेच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र, गोवा, दीव-दमन, दादरा-नगर- हवेली, मध्यप्रदेश, गुजरात व छत्तिसगढ या राज्यांचा समावेश होतो. यासाठी केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होतो. या प्रयोगशाळांसाठी 28 अधिकारी/कर्मचारी काम करतात.

    या योजनेपासून महत्वाचे रोगांवर नियंत्रण करण्यासाठी निदानात्मक कार्य, रोगाचे सर्वेक्षण यामुळे रोग नियंत्रणासाठी नियोजन करण्यास मदत मिळते. पर्यायाने याचा फायदा शेतकरी पशुपालक यांना होतो व आर्थिकदृष्ट्या होणारे नुकसान अल्प राहते.

    संभोगाव्दारे प्रसारीत होणा-या रोगांवर चाचण्या घेऊन विर्य संकलन प्रयोगशाळा यांना निष्कर्ष कळवुन त्यांना मार्गदर्शन करण्यात येते. जेणेकरुन कृत्रिम रेतन कार्याव्दारे प्रसारीत होणा-या या रोगांवर नियंत्रण पर्यायाने रोग प्रादुर्भाव कमी होतो व गोपालक शेतक-यांना याचा आर्थिक व सुआरोग्याचा लाभ होतो.

    पश्चिम विभागीय संदर्भिय पशुरोग निदान प्रयोगशाळा उद्दिष्टे –

    प्रयोगशाळा

    • रोग प्रादुर्भावामधुन नमुन्यांचे सर्वेक्षण करणे.
    • देशाच्या पश्चिम विभागातील राज्यांसाठी जिवाणू, विषाणू, परोपजिवी व इतर आर्थिक नुकसान करणाऱ्या महत्त्वाच्या रोगांसाठी संदर्भीय प्रयोगशाळा म्हणुन कार्य करणे.
    • पश्चिम विभागीय राज्यांमधील रोगांबाबत माहिती गोळा करुन इतर राज्यांना पुरविणे.
    • वर्गीकरण केलेले जिवाणू, विषाणू व परोपजिवी जंतुंची जपणुक करणे व आवश्यकतेप्रमाणे राष्ट्रीय जिवाणू /विषाणू/जंतू जपणुक प्रयोगशाळेस पाठविणे.
    • रोग निदानासाठी मान्यता प्राप्त असणा-या चाचण्या प्रमाणित करणे व त्याचबरोबर रोगनिदान करणे तसेच इतर राज्यांतील प्रयोगशाळांना माहिती देणे.
    • इतर राज्यातील प्रयोगशाळेतील अधिका-यांना रोगनिदानासंबंधी प्रशिक्षण देणे.
    • पशुधनातील क्षय, जोन्स व सांसर्गिक गर्भपात आयबीआर व कुक्कुट पक्षातील साल्मोनेल्लासीस या मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान करणा-या महत्वाच्या रोगांच्या नियंत्रणासाठी चाचण्या करणे.
    • भारत सरकार, कृषी खाते, पशुसंवर्धन विभाग, यांनी ठरवुन दिलेल्या उदा. बीएसई/स्क्रेपी इत्यादि रोगांचे सर्वेक्षण करणे.

    ॲस्कॅड

    प्रयोगशाळा

    अ) बर्ड फ्लू रोगाचे सर्वेक्षण
    ब) सर्वेक्षण, संनियंत्रण व पूर्वअंदाज बांधणे

    • ॲडमास योजना: राज्यात जनावरांच्या रोग प्रादुर्भावावर संनिरिक्षण करणे व रोगसंसर्ग शास्त्रीय माहितीचे विश्लेषण करणे.
    • भारतीय कृषि अनुसंधान परिषद समन्वित लाळ-खुरकूत रोग संशोधन प्रकल्प
    • टेलिफोन : 020-25692135
    • ईमेल : jcdis-mh[at]gov[dot]in
    • पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी पश्चिम विभागीय संदर्भिय पशुरोग निदान प्रयोगशाळा रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे