पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लि.गोखलेनगर, पुणे -४११०१६
स्थापना:
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची स्थापना कंपनी कायदा १९५६ अन्वये नोंदणी क्र.20560/सीटीए नुसार दि. ८ ऑगस्ट,१९७८ रोजी करण्यात आली आहे.
उद्दिष्टे:
- महाराष्ट्रात विदेशी/ स्थानिक/ संकरित शेळ्या मेंढयांची पैदास प्रक्षेत्रे स्थापन करणे व त्याचा विस्तार करणे.
- शेळ्या मेंढयांच्या पैदाशी करिता उपयुक्त ठिकाणी अशा केंद्राची वाढ करणे.
- शेळ्या/मेंढया आणि त्यापासून उत्पादित होणाऱ्या वस्तूंची आयात – निर्यात करणे, शेळ्या-मेंढयांची पैदास करणे आणि विक्री करणे.
- स्थानिक शेळ्या मेंढयांची जात सुधारण्यासाठी संकरित पैदास कार्यक्रम हाती घेणे/ अथवा अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाला मदत करणे.
- शेळ्या मेंढयांच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून पशुपालकांना प्रती शेळी-मेंढी मिळणाऱ्या उत्पादनात वाढ होऊन शेळी-मेंढी पालन व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी शासनाच्या मदतीने/ मदतीशिवाय विस्तार केंद्रे स्थापणे.
- शेळी मेंढी पालनाला उत्तेजन देण्यासाठी सहकारी संस्था, व्यक्ति अथवा फर्म यांना वित्तीय पुरवठा करणेकरिता मदत करणे.
प्रक्षेत्रे:
सध्या महामंडळाची ११ प्रक्षेत्रे व १ लोकर उपयोगीता केंद्र आहेत.
अ.क्र. | पत्ता |
---|---|
१ | पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लि.,गोखलेनगर, पुणे -१६ |
२ | पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र महुद, ता.सांगोला, जि.सोलापूर |
3 | पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र मुखेड, जि.नांदेड |
४ | पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पोहरा, जि.अमरावती |
५ | पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पडेगांव, जि.संभाजीनगर |
६ | पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि.सांगली |
७ | पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र अंबेजोगाई, जि.बीड |
८ | पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र तिर्थ, ता. तुळजापूर, जि.धाराशिव |
९ | पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र बिलाखेड, ता.चाळीसगांव,जि.जळगांव |
१० | पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र बोंद्री, ता.रामटेक, जि. नागपूर |
११ | पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र दहिवडी, ता. माण, जि.सातारा |
१२ | लोकर उपयोगिता केंद्र, गोखलेनगर, पुणे -१६ |
संचालक मंडळ
शासन निर्णय क्र. पविआ-२०२१/प्र.क्र.३१९/पदुम-३ दि. १२ जानेवारी २०२२ अन्वये महामंडळाच्या घटनेतील कलम ७१ व ७३ मधील तरतुदीनुसार महामंडळाचे संचालक मंडळ ७ सदस्याचे असून त्यामध्ये २ अशासकीय आणि ५ शासकीय सदस्यांचा समावेश आहे. सदय:स्थितीमध्ये खालीलप्रमाणे संचालक मंडळ नियुक्त आहे.
शासकीय सदस्य:
अ.क्र. | पत्ता |
---|---|
१ | मा. सचिव (पदु), मंत्रालय, मुंबई |
२ | मा. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य,पुणे |
3 | मा. उपसचिव पशुसंवर्धन (पदु) मंत्रालय, मुंबई |
४ | मा. अवर सचिव (पदु) मंत्रालय,मुंबई |
५ | मा. व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे |
कार्ये:
महामंडळामार्फत विविध विकासात्मक उपक्रम राबविले जातात यामध्ये प्रामुख्याने खालील कामाचा समावेश आहे.
महामंडळाच्या प्रक्षेत्रावर सुधारित जातीच्या शेळया मेंढयांची पैदास करून त्यापासून उत्पादित होणारे सुधारित जातीचे मेंढेनर व बोकड मेंढपाळ/शेतकऱ्यांना पैदाशीसाठी वाटप करण्यात येतात.
- महामंडळाच्या प्रक्षेत्रावर ३ दिवसाचे शेळी मेंढी पालनाचे प्रशिक्षण दरमहा आयोजित करून लाभधारकांना प्रशिक्षण देण्यात येते.
- मेंढपाळांच्या मेंढयांची यांत्रिक पद्धतीने लोकर कातरणी करण्यात येते. शेळ्यांच्या कृत्रिम रेतनामध्ये डिजिटल गनचा वापर करून पशुसंवर्धन विभागाच्या दावाखान्यामार्फत शेळ्या मध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
- माणदेशी फौंडेशन, म्हसवड व महामंडळ यांचे संयुक्त विद्यमाने राज्यात शेळी विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
- महाराष्ट्र जीवन्नोत्ती अभियान व महामंडळ यांचे संयुक्त विद्यमाने शेळ्यामध्ये अनुवांशिक सुधारणा व आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम सुरु आहे.
- केंद्रीय भेड व उन अनुसंधान संस्था, राजस्थान यांचे मार्गदर्शनातून राज्यामध्ये लोकर प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येत आहे.
- फिरते पशुचिकित्सालया मार्फत राज्यातील शेळ्या व मेढ्यांना आरोग्य सुविधा महामंडळामार्फत पुरविण्यात येत आहे.
- यांत्रिक पद्धतीने मुरघास निर्मित्ती केंद्रे व स्थापन करणे पशुखाद्य निर्मिती केंद्रे महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रावर स्थापन करण्यात आलेले आहे.
- मेंढपाळांची लोकर रास्त दरात खरेदी करणे, लोकर वस्तु निर्मिती आणि विक्री करणे.
- महामंडळाच्या रांजणी जि. सांगली या प्रक्षेत्रावर केंद्र पुरस्कृत नामशेष होत असलेल्या जातीचे संवर्धन या योजनेखाली माडग्याळ मेंढयांचे संवर्धन व विकास हा कार्यक्रम सन २००५-०६ पासून राबविण्यात येत आहे. या प्रक्षेत्रावर माडग्याळ जातीच्या मेंढयांची पैदास सुरू करून त्यापासून उत्पादित मेंढेनर स्थानिक शेतकरी/मेंढपाळांना पैदाशीसाठी पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे या भागात माडग्याळ मेंढयांची पैदास मोठया प्रमाणावर सुरू झालेली आहे. या अंतर्गत राज्यामध्ये माडग्याळ शीप ब्रीडर असोसिएशन, स्थापन झाली आहे. या माध्यमातून सुद्धा माडग्याळ मेंढी विकासाचे कार्य सुरू आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर या मेंढीची मांनाकन नोंदणी होणेकरिता या मेंढ्यांचे सर्वेक्षण करून तसा अहवाल केंद्र शासनास (एनबीएजीआर, कर्नाल) सादर करण्यात आलेला आहे.
- राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन २०१४-१५ वर्षात महामंडळाच्या पडेगाव, जि. औरंगाबाद; बिलाखेड जि. जळगाव; अंबेजोगाई जि. बीड;दहिवडी जि. सातारा; रांजणी जि. सांगली; मुखेड, जि. नांदेड; पोहरा जि.अमरावती; महूद जि. सोलापूर; बोंद्री जि. नागपूर व तिर्थ जि. उस्मानाबाद या प्रक्षेत्रावरील एकुण ५१३.०० हेक्टर क्षेत्रावर एकदल व द्विदल गवत वैरण प्रजातीची लागवड करण्यासाठी, सिंचनाच्या मुलभुत सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी रु. ३३४.९४ लाख निधी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेला होता. याअंतर्गत शेळ्या मेंढ्याकरिता उपयुक्त चारा पिकांचे ठोंबे व बियाणे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात येत आहे. तसेच यामुळे शेळ्यामेंढ्याकरिता चारा निर्मिती बाबत व्यापक जनजागृती झालेली आहे.
- राज्यातील मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेअंतर्गत राजे यशवंतराव होळकर महामेष योजना या नावाने ६ मुख्य घटकांसह नविन योजना सुरू करण्यास शासन निर्णय क्र. पविआ-२०१७/प्र.क्र.६५/पदुम-३ दि. ०२ जून २०१७ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. ही योजना सन २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून राबविण्यात येत आहे. याअंतर्गत महामंडळास रु. ५३७८.०० लाख तरतुद वितरित करण्यात आलेली आहे. तसेच चालू वर्षामध्ये रु. २५००.०० लाख निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे. वितरीत निधी मधून राज्यातील ५००० हजार मेंढपाळ कुटुंबाना या योजनेचा लाभ झालेला आहे.
- राज्यामध्ये समूह विकासामधून शेळी पालन व्यवसायास गती देणे, शेळी पालन संबंधीत नवीन उद्योजक निर्माण करणे, शेळी पालकांना प्रशिक्षण, अद्यावत तंत्रज्ञान, आरोग्य सुविधा, अनुवंशिक सुधारणा तसेच शेळ्या करिता विपणन व्यवस्था उपलब्ध करून देणे, शेळी व्यवसायाकरीता फॉरवर्ड लिंकेजेस निर्माण करून देणे, शेळ्यांच्या वजनावर विक्रीची व्यवस्था, कत्तलखाना निर्मिती, दुधप्रक्रिया उद्योग निर्माण करणे, शीतगृह, खाद्य कारखाना व निर्यात सुविधा उपलब्ध करून देणे, शेळी पालन व्यवसायाकरिता लागणारे साहित्य व इतर आवश्यक बाबी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे या करिता राज्यामध्ये प्रत्येक विभागात शेळी समूह योजना राबविण्यात येत आहे.
- राज्यातील भटक्या जमाती- क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीमधील मेंढपाळ कुटुंबांना राज्यस्तरीय योजनेंतर्गत माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी चराई अनुदान देणे व राज्यातील भटक्या जमाती- क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील लाभार्थ्यांना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता जागा खरेदीसाठी अनुदान स्वरुपात एकवेळचे एकरकमी अर्थसहाय्य देणे या योजना महामंडळाकडून राबविण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे.