राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र, गोखलेनगर, पुणे
संस्थेची स्थापना :-
शासन निर्णय क्र. पसं प्र-१००१/प्र.क्र.२९ (भाग-४)/पदुम-१, मंत्रालय, मुंबई-३२, दि. २५ मे २००४ अन्वये सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम गोखलेनगर, पुणे-१६ या संस्थेचे पुनर्रचने अंतर्गत रूपांतरण करून त्या ऐवजी राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र, गोखलेनगर, पुणे-१६ या संस्थेची स्थापना करण्यात आली.
उद्दिष्टे :-
राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था, गोखलेनगर, पुणे–१६ ही संस्था पशुसंवर्धन खात्यातील क्षेत्रीय तांत्रिक अधिकार्यांनना प्रशिक्षण देणारी खात्याची एकमेव संस्था असून सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व पशुधन विकास अधिकारी या अधिकार्यांदना तसेच सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक या कर्मचार्यां ना प्रशिक्षण देणे हे या संस्थेचे मुख्य उद्दीष्ट आहे.
शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यव्साय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचा टीआरजी/२०१२/ प्र.क्र ५६/पदुम -४ दि. ०५ मार्च २०१२ च्या शासन निर्णयानुसार राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था, गोखलेनगर, पुणे-१६ या संस्थेत महाराष्ट्र राज्याच्या प्रशिक्षण धोरणानुसार पशुसंवर्धन खात्यातील तांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांचेकरिता तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. पशुसंवर्धन खात्यातील कार्यरत असलेल्या तांत्रिक अधिकार्यांकची तांत्रिक कुशलता, कार्यक्षमता वाढावी तसेच अद्ययावत संशोधनाची माहिती मिळावी व पशुपालकास आधुनिक पशुवैद्यकीय सेवा गुणात्मक रितीने वाढ होऊन मिळावी या अनुषंगाने राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था, गोखलेनगर, पुणे-१६ येथे पुढील प्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
-
- तेरा (१३) दिवसीय पायाभूत तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम,
- पाच (०५) दिवसीय तांत्रिक उजळणी प्रशिक्षण कार्यक्रम
- पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) यांचे साठी (०५) दिवसीय विशेष तांत्रिक उजळणी
प्रशिक्षण कार्यक्रम - अॅस्कॅड अंतर्गत पाच(०५) /सहा(०६) दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण
- विविध विषयांवर तीन(०३)/ दोन(०२)/ एक(०१) दिवसीय नवीन विषयांची तोंडओळख
प्रशिक्षण कार्यक्रम.