पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी (एएचआयडीएफ)
पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अभियान प्रोत्साहन पॅकेज अंतर्गत १५००० कोटी रुपयांचा पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (एएचआयडीएफ) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. वैयक्तिक उद्योजक, खाजगी कंपन्या, एमएसएमई, शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) आणि कलम ८ कंपन्यांनी पुढील घटकांच्या गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास (एएचआयडीएफ) मंजूर करण्यात आला आहे.
- डेअरी प्रक्रिया आणि मूल्यवर्धन पायाभूत सुविधा
- मांस प्रक्रिया आणि मूल्यवर्धन पायाभूत सुविधा
- पशुखाद्य प्रकल्प स्थापन करणे
उद्दिष्टे:
- दूध आणि मांस प्रक्रिया क्षमता वाढविणे आणि उत्पादन वैविध्य वाढविण्यास मदत करणे ज्यामुळे असंघटित ग्रामीण दूध आणि मांस उत्पादकांना संघटित दूध आणि मांस बाजारपेठेत अधिक प्रवेश प्रदान करणे.
- उत्पादकाला वाढीव किंमत उपलब्ध करून देणे.
- ग्राहकांसाठी दर्जेदार दूध व मटण उत्पादने उपलब्ध करून देणे.
- देशातील वाढत्या लोकसंख्येची प्रथिनेसमृद्ध दर्जेदार अन्नाची गरज आणि जगातील सर्वाधिक कुपोषित बालकांच्या लोकसंख्येतील कुपोषण रोखण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे.
- उद्योजकता विकसित करणे आणि रोजगार निर्माण करणे.
- निर्यातीला चालना देणे आणि दूध आणि मांस क्षेत्रात निर्यात योगदान वाढविणे.
- जनावरे, म्हैस, मेंढ्या, शेळी, वराह व कुक्कुट यांना माफक दरात संतुलित रेशन उपलब्ध करून देण्यासाठी दर्जेदार पशुखाद्य उपलब्ध करून देणे.
अ. क्र. | विषय | येथे वाचा |
---|---|---|
1 | योजनेची मार्गदर्शक तत्त्वे | अंमलबजावणी मार्गदर्शक तत्त्वे एएचआयडीएफ (5.6 एमबी) |
2 | वारंवार विचारले जाणारे प्रश्न | एफ ए क्यू एएचआयडीएफ (137 केबी) |
एएचआयडीएफ अंतर्गत कर्जासाठी येथे अर्ज करा : https://ahidf.udyamimitra.in/
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे