बंद

    राष्ट्रीय पशुधन अभियान

    • तारीख : 01/01/2021 -

    केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत खालील प्रमाणे विविध 3 उप-अभियानांचा समावेश केलेला आहे.

    • पशुधन आणि कुक्कुट प्रजाती विकास उप-अभियान: या उप-अभियानातून उद्योजकता विकासावर आणि कुक्कुट, मेंढ्या, शेळी आणि वराह यांच्या प्रजाती सुधारण्यावर भर देण्यात आलेला आहे.
    • पशु खाद्य व वैरणउप-अभियान या उप- अभियानातून चारा बियाणे साखळी मजबूत करण्याकरिता उत्पादनासाठी आवश्यक प्रमाणित चारा बियाणांची उपलब्धता सुधारण्यासाठी आणि चारा ब्लॉक/हे बेलिंग/सायलेज युनिट्सच्या स्थापनेसाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

    • नाविन्यपुर्ण योजना व विस्तार उप-अभियान : मेंढ्या, शेळी, वराह आणि चारा आणि चारा क्षेत्र, विस्तार उपक्रम, पशुधन विमा आणि नवोपक्रमाशी संबंधित संशोधन आणि विकास करणाऱ्या संस्था, विद्यापीठे, संस्थांना प्रोत्साहन देणे हे उप-मिशनचे उद्दिष्ट आहे.

    केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान या अंतर्गत खालील योजनांचा समावेश होतो.

    • उपयोजना – ग्रामीण कुक्कुट पालनातुन प्रजाती विकासाद्वारे उद्योजगता विकास

    योजना कालावधी :

    सन २०१४ -२०१५, सन २०२१-२२ पासून सुधारित स्वरुपात

    लाभार्थी :

    वैयक्तिक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, सामुहिक दायित्व गट व नियम ८ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, लाभार्थी अर्ज व निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने www.nlm.udyamimitra.inया पोर्टल वर

    लाभ-

    कमीत कमी 1,000 अंड्यावरील (लो इनपुट तंत्रज्ञान) कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन व अंडी उबवणी केंद्राची स्थापना, एक वेळ 50 टक्के भांडवली अनुदान अधीकतम मर्यादा रु. 25.00 लक्ष प्रती युनिट (दोन समान हप्त्यांमध्ये) (उर्वरीत 50 टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी स्वहिस्सा)

    • उपयोजना – ग्रामीण शेळी मेंढी पालनातुन प्रजाती विकासाद्वारे उद्योजगता विकास

    योजना कालावधी:

    सन २०१४ -२०१५, सन २०२१-२२पासून सुधारित स्वरुपात

    लाभार्थी :

    वैयक्तिक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, सामुहिक दायित्व गट व नियम ८ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, लाभार्थी अर्ज व निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने www.nlm.udyamimitra.inया पोर्टल वर

    लाभ-

    500 शेळ्या/ मेंढ्या + 25 बोकड / नर मेंढे गटाची स्थापना करणे (उर्वरीत 50 टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी स्वहिस्सा) सर्व प्रवर्गांसाठी, 50 टक्के भांडवली अनुदान रु. 50.00 लक्ष (दोन समान हप्त्यांमध्ये), छोटे गट (400+20, 300+15, 200+10, 100+5) नुसार अनुषंगिक अनुदान ( रु. ४० लाख, ३० लाख, २० लाख, १० लाख) उपलब्ध

    • उपयोजना – वराहपालनद्वारे उद्योजगता विकास

    योजना कालावधी:

    सन २०१४ -२०१५, सन २०२१-२२पासून सुधारित स्वरुपात

    लाभार्थी :

    वैयक्तिक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, सामुहिक दायित्व गट व नियम ८ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, लाभार्थी अर्ज व निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने www.nlm.udyamimitra.inया पोर्टल वर

    लाभ-

    सर्व प्रवर्गांसाठी -100 मादी + 10 नर वराह गटाची स्थापना करणे, एक वेळ 50 टक्के भांडवली अनुदान रु. ३० लक्ष, छोटे गट 50 मादी+5 नर नुसार रु. १५.00 लक्ष अनुदान (उर्वरीत 50 टक्के बँके चे कर्ज अथवा लाभार्थी स्वहिस्सा)

    • उपयोजना- पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास

    योजना कालावधी:

    सन २०२१-२२पासून सुधारित स्वरुपात

    लाभार्थी :

    वैयक्तिक उद्योजक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, सामुहिक दायित्व गट व नियम ८ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, लाभार्थी अर्ज व निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने www.nlm.udyamimitra.inया पोर्टल वर

    लाभ-

    मुरघासबेलर, वैरणीच्या विटा आणि टी.एम.आर निर्मीती करीता दोन टप्प्यांमध्ये अनुदान सर्व प्रवर्गांसाठी, प्रकल्पकिंमतीच्या ५० टक्के रु. ५०.०० लक्ष पर्यंत

    लाभार्थी अर्ज व निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने www.nlm.udyamimitra.in

    महत्त्वाची कागदपत्रे
    अनु. क्र विषय येथे वाचा
    १. सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे (जाने. २०२५)
    ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वे पहा(1.6 एमबी)
    २. वारंवार विचारले जाणारे प्रश्न
    वारंवार विचारले जाणारे प्रश्न पहा(87 केबी)
    ३. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान: अनुदान वितरणाबाबत
    केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान: अनुदान वितरणाबाबत पहा(521 केबी)
    ४. अर्जाचा नमुना
    अर्जाचा नमुना पहा(418 केबी)
    ५. कागदपत्रांची यादी
    कागदपत्रांची यादी पहा(304 केबी)
    ६. कागदपत्र नमुने https://nlm.udyamimitra.in/Home/Documents

    हेल्प डेस्क

    सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन वेळ स. ०९.४५ ते सायं. ०६.१५

    संपर्क:
    ८२७५१६९९७२, ८२७५०८७२०८, ८२७५३७५४९३

    ७५८८९०१८५९ (वैरण प्रकल्प)

    ०२०-२५६९०४८०, ०२०-२५६९०४८१, ०२०-२५६९०४८५

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ऑनलाईन पद्धतीने