- योजनेचे नाव : जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अनु .जाती उपयोजना(विघयो)/आदिवासी उपयोजना/आदिवासि क्षेत्राबाहेरील उपयोजना अंतर्गत २ दुभत्या गाई /म्हशी गट वाटप करणे
योजना कालावधी : २०११ ते आजपर्यंत, २७.०४.२०२३ पासून सुधारती स्वरुपात
लाभार्थी प्राधान्य: दारिद्र्य रेषे खालील, अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक,सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गटातील लाभार्थी.
लाभ – २ दुधाळ देशी /२ दुधाळ संकरीत गायी/ २ म्हशींचे गट वाटप करणे, अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान,
गट किंमत: रु.७०,०००/-प्रतीगाय, रु.८०,०००/-प्रतीम्हैस २ दुधाळ देशी /२ दुधाळ संकरीत गायी- रु. १५६८५०/- २ म्हशींचा गट रु. १७९२५८/-
शासन निर्णय २२.११.२०११ शासन निर्णय २७.०४.२०२३ शासन निर्णय २७.०४.२०२३
- योजनेचे नाव – जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अनु .जाती उपयोजना(विघयो)/आदिवासी उपयोजना/आदिवासी क्षेत्रा बाहेरील उपयोजना अंतर्गत अंशतः ठाणबंद पद्धतीने १० शेळी +१ बोकड / १० मेंढ्या + १ नर मेंढा गट वाटप करणे
योजना कालावधी :२०११ ते आजपर्यंत, २५.०५.२०२१ पासून सुधारित स्वरुपात
लाभार्थी प्राधान्य -दारिद्र्य रेषेखालील, अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार,महिला बचत गटातील लाभार्थी
लाभ – १० शेळ्या/मेंढ्या व १ बोकड/नर मेंढा यांचेगटवाटप, अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान,उस्मानाबादी/संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड तसेच माडग्याळ किंवा दख्खनी मेंढ्या अथवा अन्य स्थानिक, स्थानीक यांचे गटांचे वाटप करण्यात येते.
गट किंमत: उस्मानाबादी/संगमनेरीशेळी रु.१०३५४५/- स्थानिक शेळी रु.७८२३१/-,माडग्याळ मेंढ्या रु.१२८८५०/-दख्खनी व स्थानिक मेंढ्या रु.१०३५४५/-
शासन निर्णय ११.११.२०११ शासन निर्णय २५.०५.२०२१
- योजनेचे नाव :जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजने अंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम: १०० एकदिवसीय पिल्ले वाटप
योजना कालावधी: २०१० ते आजपर्यंत, २०.०१.२०२३ पासून सुधारित स्वरुपात
लाभार्थी प्राधान्य – दारिद्र्य रेषे खालील, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अल्प व अत्यल्प भूधारक
लाभ- सर्व प्रवर्गांसाठी ५०% अनुदान, एक दिवसीय १०० पिल्ले वाटप गट किंमत रु .२९,५०० /-
- योजनेचे नाव : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजने अंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम: २५+३ तलंग गट वाटप
योजना कालावधी: २०१० ते आजपर्यंत, २०.०१.२०२३ पासून सुधारित स्वरुपात
लाभार्थी प्राधान्य – दारिद्र्य रेषेखालील, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अल्प व अत्यल्प भूधारक
लाभ- सर्व प्रवर्गांसाठी ५०% अनुदान, २५ + ३ तलंगा गट वाटप -गट किंमत रु.१०,८४०/-