बंद

    नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजना

    • तारीख : 22/11/2023 -
    1. योजनेचे नाव –

      राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी २ दुधाळदेशी /२ दुधाळ संकरीत गायी/ २ म्हशींचे गट वाटप करणे

    2. योजना कालावधी :

      २०१५ ते आजपर्यंत, २७.०४.२०२३ पासून सुधारित स्वरुपात

      लाभार्थी प्राधान्य :

      महिला बचत गटातील लाभार्थी,अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार

      लाभ:

      २ दुधाळदेशी /२ दुधाळ संकरीत गायी/ २ म्हशींचे गट वाटप करणे, सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ५० टक्के आणि अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान,

      गट किंमत:

      रु.७०,०००/-प्रतीगाय, रु.८०,०००/-प्रतीम्हैस २ दुधाळदेशी /२ दुधाळ संकरीत गायी-रु. १५६८५०/-२ म्हशींचा गट रु.१७९२५८/-

      अर्ज कसा करावा*-

      ऑनलाइन पद्धतीने www.ahmahabms.com या पोर्टल वर

    3. योजनेचे नाव –

      राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत अंशत: ठाणबद्ध पद्धतीने शेळी /मेंढीपालनाव्दारे शेतक-यांना पूरक उत्पन्न मिळवून देणे.

    4. योजना कालावधी :

      २०११ ते आजपर्यंत, २५.०५.२०२१ पासून सुधारित स्वरुपात

      लाभार्थी प्राधान्य-

      दारिद्र्य रेषेखालील, अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक,सुशिक्षित बेरोजगार,महिला बचत गटातील लाभार्थी

      लाभ-

      १० शेळ्या/ मेंढ्याव १ बोकड/ नर मेंढा यांचेगटवाटप, सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ५० टक्के आणि अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान, उस्मानाबादी /संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड तसेच मडग्याळ किंवा दख्खनी मेंढ्या अथवा अन्य स्थानिक मेंढ्या गटांचे वाटप करण्यात येते.

      गट किंमत:

      उस्मानाबादी/ संगमनेरी शेळी रु.१०३५४५/-,स्थानिक शेळी रु.७८२३१/-,मडग्याळ मेंढ्या रु.१२८८५०/-, दख्खनी व स्थानिक मेंढ्या रु.१०३५४५/-

      अर्ज कसा करावा*-

      ऑनलाइन पद्धतीने www.ahmahabms.comया पोर्टल वर

    5. योजनेचे नाव –

      १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपानाद्वारे कुक्कुटपालन व्यवसायसुरु करणे

    6. योजना कालावधी :

      २०१३ ते आजपर्यंत

      लाभार्थी प्राधान्य:

      अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक,सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट किंवा उपरोक्त तीन मधील वैयक्तिक महिला लाभार्थी

      लाभ-

      एकूण प्रकल्पाची किंमत रु. २,२५,०००/-, पक्षीगृह (१०००चौ.फूट) स्टोर रूम,पाण्याची टाकी,निवासाची सोय,विद्युतीकरण इ.साठी एकूण किंमत रु. २,००,०००/-तर उपकरणे, खाद्याची /पाण्याची भांडी, ब्रुडर इ.बाबत रक्कम रु. २५,०००/-सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गट किंमतीच्या ५० टक्के आणि अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना प्रकल्प किंमतीच्या ७५ टक्के अनुदान

      अर्ज कसा करावा*-

      ऑनलाइन पद्धतीने www.ahmahabms.com या पोर्टल वर

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे