बंद

    “मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना” राज्यस्तरीय योजना

    तारीख : 26/11/2026 -
    • योजनेचे नाव :5 दुधाळ गाय/म्हैस प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना

    लाभाचे स्वरुप: ०५ दुधाळ गाय/ म्हैस व ३ वर्षाचा विमा, शेड व साधन सामुग्री

    लाभार्थी : सर्व प्रवर्गातील अल्पभुधारक, अत्यल्प भुधारक व महिला बचत गट

    अनुदानाचे स्वरुप (१) सर्वसाधारण लाभार्थी ५० टक्के (रु. ५,६७,५९० /-)
    (२) अनुसुचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी ७५ टक्के (रु. ८,५१,३८५/-)
    (३) अनुदान २ टप्यात देय राहील. एकुण अनुदानाच्या ५० टक्के इतके पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्याने शेड निर्मिती तसेच साधनसामुग्री खरेदी केल्यानंतर देय राहील व उर्वरीत दुसऱ्या टप्प्याचे ५० टक्के अनुदान जनावरांच्या खरेदीनंतर देण्यात येईल.
    प्रकल्पाची किंमत:
    (१) ५ गाय/ म्हैस रु. ५,००,०००/-
    (प्रति गाय व म्हैस रु. १ लक्ष) व विमा (रु ५,६०,१८०/-)
    (२) शेड निर्मिती- रु. ३,००,०००/-
    (३) साधन सामुग्री (कडबाकुट्टी यंत्र, फॉगिंग मशीन, खाद्यपाण्याची भांडी, मिल्कींग मशीन, दुध कॅन, फवारणी यंत्र, सोलर ३५ व इतर साहित्य) रु.२,७५,०००/-
    प्रकल्पाची एकूण किंमत-रु. ११,३५,१८०/-

    शासन निर्णय ०९.०३.२०२६

     

      • योजनेचे नाव :शेळी / मेंढी गट वाटप योजना

      लाभाचे स्वरुप:
      ५०+५ शेळी/मेंढी गट व ३ वर्षाचा विमा, शेड व साधन सामुग्री

      लाभार्थी:
      सर्व प्रवर्गातील अत्यल्प भुधारक, अल्प भुधारक, महिला बचत गट
      प्रकल्पाची किंमत : ५०+५ शेळी/मेंढी
      (१) पशुधन खरेदी- प्रती शेळी / मेंढी रु. १२,०००/- व बोकड / मेंढा रु.१५,०००/- प्रमाणे
      गटाची किंमत- रु. ६,७५,०००/-
      २) ३ वर्षाचा विमा-१२.७५% (+ १८% GST)-रु. १,०१,५५४/-
      ३) शेड निर्मिती- रु. २,००,०००/-
      ४) कडबा कुट्टी यंत्र-रु.३०,०००/-
      ५) सोलर (३ kw)-रु. १,३२,०००/-
      प्रकल्पाची एकूण किंमत – रु.११,३८,५५४/-

      अनुदानाचे स्वरुप
      १) सर्वसाधारण लाभार्थी ५० टक्के ( रु. ५,६९,२७७/-)
      २) अनु. जाती जमाती लाभार्थी ७५ टक्के (रु. ८,५३,९१५/-)
      ३) अनुदान २ टप्प्यात देय राहील. एकूण अनुदानाच्या ५० टक्के पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्याने शेड निर्मिती तसेच साधनसामुग्री खरेदी केल्यानंतर व उर्वरीत दुसऱ्या टप्प्याचे ५० टक्के अनुदान शेळी/मेंढी गट खरेदीनंतर देण्यात येईल.

      शासन निर्णय ०९.०३.२०२६

       

        • योजनेचे नाव :अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट / देशी पक्षांचे वाटप

        लाभाचे स्वरुप:
        किमान २०० अंडी उत्पादन देणारे ५००० एक दिवशीय पक्षी, १ महिन्याच्या खाद्यावरील खर्च, अर्धबंदिस्त / पिंजरा / गादी पध्दतीने शेड बांधकाम, खाद्य, पाणी पुरवठा, भांडी, अंडी ठेवण्याकरीता ट्रे, एग नेस्ट, ऑटोमेशन प्रणाली, इत्यादी आवश्यक साहित्य, सोलर (३ kw)

        लाभार्थी
        सर्व प्रवर्गातील लाभार्थी
        लाभार्थी निकष: सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.
        अ) अत्यल्प भुधारक, ब) अल्पभुधारक, क) वनहक्क धारक ड) सुशिक्षित बेकार, इ) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते ड मधील)
        १) वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी ५ व महिलांना ५० :आरक्षण लागू राहील.
        २) आरक्षणानुसार पुरेसे महिला पात्र अर्जदार उपलब्ध न झाल्यास इतर घटकांमधील लाभार्थ्याना लाभ देण्यात येईल.

        प्रकल्पाची किंमत:
        १) किमान २०० अंडी उत्पादन देणारे ५००० एक दिवशीय पक्षी (रु. ५०/-प्रती पक्षी प्रमाणे) – रु. २,५०,०००/-
        २) १ महिन्याच्या खाद्यावरील खर्च (३ कि.ग्रॅ. प्रती पक्षी x ५००० पक्षी x रु.३०/- प्रती कि.ग्रॅ. प्रमाणे) रु. ४,५०,०००/
        ३) अर्धबंदिस्त / पिंजरा / गादी पध्दतीने शेड बांधकाम रु. १५,००,०००/-च्या मर्यादेत
        ४) खाद्य, पाणी पुरवठा, भांडी, अंडी ठेवण्याकरीता ट्रे, एग नेस्ट, ऑटोमेशन, इत्यादी आवश्यक साहित्य- रु. ६,६८,०००/-
        ५) सोलर (३ kw) – रु.१,३२,०००/-
        ६) प्रकल्प एकूण किंमत – रु.३०,००,०००/-

        शासन निर्णय ०९.०३.२०२६

         

          • योजनेचे नाव :पशुपालक/शेतकऱ्यांना देशी / सुधारित मार्सल कुक्कुट ३००० ते ५००० पर्यंत पक्षांच्या संगोपनाद्वारे उद्योजकता विकास योजना

          लाभाचे स्वरुप:
          शेड क्षेत्र, सोलर, खाद्य व पाणी भांडी, सोलर प्रणाली (३ kw क्षमतेची)

          लाभार्थी
          सर्व प्रवर्गातील लाभार्थी
          लाभार्थी निकष: सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती
          प्रकल्पाची किंमत:
          १) शेड – प्रती पक्षी १.२ चौ.फु. जागा आवश्यक, खर्च रु. २५०/- प्रती चौ.फु. दर
          २) खाद्य व पाणी भांडी इत्यादी प्रती पक्षी रु.५०/- प्रमाणे
          ३) सोलर अंदाजीत रु १५००००/- (अन्य योजनेत लाभ घेतल्यास अनुज्ञेय नाही)
          ४) प्रकल्पाची एकूण किंमत-३००० पक्षी- रु. १२,००,०००/-
          ५) ५००० पक्षी- रु. १९,००,०००/-

          पात्रता
          १) किमान २० गुंठे स्वतःची किंवा किमान ५ वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा असलेली जमीन, मात्र वनहक्क धारकांना ही अट लागू राहणार नाही.
          २) कुक्कुटपालन व्यवसायातील किमान २ वर्षाचा अनुभव किंवा शासन / शासनमान्य संस्थांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र (कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रशिक्षण न घेतलेल्या लाभार्थ्यांनी लाभघेण्यापुर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक)

          अनुदानाचे स्वरुप
          १) सर्वसाधारण लाभार्थी ५० % (३००० पक्षी ६,००,०००/- तर ५००० पक्षी-रु. ९,५०,०००/-)
          २) अनु. जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी ७५ टक्के (३००० पक्षी-९,००,०००/- तर ५००० पक्षी-रु. १४,२५,०००/-)
          ३) अनुदान २ टप्यात देय राहील. एकूण अनुदानाच्या ५० % इतका पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्याने शेड निर्मिती केल्यानंतर देय राहील व उर्वरीत दुसऱ्या टप्याचे ५० % अनुदान साधनसामुग्री खरेदी व पक्षी खरेदीनंतर देण्यात येईल.

          शासन निर्णय ०९.०३.२०२६

           

            • योजनेचे नाव :१००० प्रती आठवडा अंडी उबवणी क्षमतेच्या संयंत्राचा (Incubator, Hatcher) पुरवठा योजना

            लाभाचे स्वरुप:
            प्रती आठवडा १००० अंडी उबवणी क्षमतेचे संयंत्र (Incubator, Hatcher), सोलर यंत्रणा (३ kw क्षमता)

            लाभार्थी निकष:
            : सर्व प्रवर्गातील लाभार्थी
            लाभार्थी निकष: सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.
            अ) भुमीहीन, ब) अत्यल्प भुधारक, क) अल्पभुधारक, ड) सुशिक्षित बेकार,
            इ) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते ड मधील)
            १) वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के तसेच महिलांना ५० टक्के आरक्षण लागू राहील.
            २) आरक्षणानुसार पुरेसे पात्र अर्जदार उपलब्ध न झाल्यास इतर घटकांमधील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.
            पात्रता:
            १) कुक्कुटपालन व्यवसायातील किमान २ वर्षाचा अनुभव किंवा शासन / शासनमान्य संस्थांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र (प्रशिक्षण न घेतलेल्या लाभार्थ्यांनी प्रशिक्षण घेणे आवश्यक)

            प्रकल्पांची किंमत
            १) प्रती आठवडा १००० अंडी उबवणी क्षमतेचे संयंत्र (Incubator, Hatcher) रु २, ०८,०००/-
            २) सोलार युनिट (३ kw)- रु १,३२,०००/-
            एकूण किंमत ३,४०,०००/-

            अनुदानाचे स्वरुप
            १) सर्वसाधारण लाभार्थी ५० टक्के (रु.१,७०,०००/-)
            २) अनुसुचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी – ७५ टक्के टक्के (रु. २,५५,०००/-)

            आवश्यक कागदपत्रे
            १) कुक्कुटपालन व्यवसायातील किमान २ वर्षाचा अनुभव असल्याबाबतचे स्थानिक पशुवैद्यक अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र किंवा कुक्कुटपालन व्यवसायाचे शासन / शासनमान्य संस्थांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र (कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रशिक्षण न घेतलेल्या लाभार्थ्यांनी लाभ घेण्यापुर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमी पत्र)
            २) दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र ३) बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र

            शासन निर्णय ०९.०३.२०२६

             

              • योजनेचे नाव :शेळी /मेंढी / गाय / म्हैस / कुक्कुटपालन तसेच वराहपालन व्यवसायाद्वारे उद्योजकता विकास करणेसाठी घेतलेल्या कर्जामध्ये व्याज सवलत देणे योजना

              लाभाचे स्वरुप:
              शेळी / मेंढी / गाय / म्हैस /कुक्कुटपालन व्यवसायासाठी प्रकल्प धारकाने वित्तीय संस्थाकडून घेतलेल्या कर्जाची विहीत मुदतीत परतफेड केल्यास व्याज दरात ४ टक्के व्याज सवलत

              लाभार्थी
              सर्व प्रवर्गातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
              २) दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र ३) बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र
              पात्रता:
              १) बँकेकडून कर्ज घेऊन शेळी / मेंढी / गाय / म्हैस / कुक्कुटपालन प्रकल्प, चारा प्रक्रिया / पशुखाद्य निर्मिती कारखाना
              २) केंद्र / राज्याच्या अन्य अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

              अनुदानाचे स्वरुप:
              कर्जावरील व्याजदरात ४ टक्के सवलत एकूण रु. ४,००,००० च्या मर्यादेत पुर्ण कर्जाची परतफेड झाल्यानंतर

              आवश्यक कागदपत्रे
              बँकेचे प्रकल्प मंजूरी व कर्ज मंजूरीचे पत्र

              अटी व शर्ती
              १) लाभार्थ्याने निवड झाल्याचे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन यांनी कळविल्यानंतर प्रकल्प / कारखाना उभारणी करावी.
              २) कर्जाची विहित वेळेत परतफेड करणे आवश्यक.
              ३) घेतलेल्या कर्जावरील व्याज दरात ४ टक्के सवलत (एकूण रु. ४,००,००० च्या मर्यादेत) पुर्ण कर्जाची परतफेड झाल्यानंतर बँकेचे नादेय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांनी DBT व्दारे अनुदान हिस्सा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अदा करावा.

              शासन निर्णय ०९.०३.२०२६

               

                • योजनेचे नाव :वैरण विकास योजना

                लाभाचे स्वरुप:
                मुरघास हार्वेस्टर (४ ओळी एकाचवेळी हॉरवेस्ट) व मुरघास बेलर संयंत्र

                लाभार्थी निकष:
                सर्व प्रवर्गातील लाभार्थी
                लाभार्थी निकष: सर्वसाधारण प्रवर्ग, अ.जाती, जमाती लाभार्थी निवड खालील घटकांतून उतरत्या क्रमाने करण्यात येईल.
                अ) अत्यल्प भूधारक ब) अल्प भूधारक क) वनहक्क धारक
                ड) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ व क मधील)
                १) दिव्यांगांसाठी ५ % व महिलांना ३० % आरक्षण लागू राहील.
                २) आरक्षणानुसार पुरेसे पात्र अर्जदार उपलब्ध न झाल्यास इतर घटकांमधील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.

                पात्रता
                किमान १० मोठे पशुधन / १०० शेळ्या किंवा मेंढ्या संख्या, स्वतःचा किमान ५० hp ट्रॅक्टर आवश्यक.
                उपकरणाची किंमत रु.२६,००,०००/- च्या मर्यादेत

                अनुदानाचे स्वरुप
                १) सर्वसाधारण लाभार्थी ५० टक्के (रु.१३,००,०००/-)
                २) अनुसुचित जाती / जमाती लाभार्थी ७५ टक्के (रु.१९,५०,०००/-)

                आवश्यक कागदपत्रे
                १) किमान १० मोठे पशुधन / १०० शेळ्या किंवा मेंढ्या असल्याबाबतचे स्थानिक पशुधन विकास अधिकारीचे प्रमाणपत्र
                २) अर्जदाराच्या नावे / कुटुंबातील सदस्याचे नावे असलेले ट्रॅक्टरचे नोंदणी कार्ड (आरसी कार्ड)
                ३) दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र
                ४) बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र
                ५) स्वः हिश्श्याची रक्कम जमा असल्याचे स्वतः च्या बँक खात्याचे एक महिन्याचे विवरणपत्र

                शासन निर्णय ०९.०३.२०२६

                 

                  • योजनेचे नाव :पशुसंवर्धन व्यवसायात Artificial Intelligence व ML (Machine Learning) तंत्रज्ञानाचा वापर योजना

                  लाभाचे स्वरुप:
                  पशुपालकाकडील गाय / म्हैशीच्या गळ्यातील सेन्सर/स्मार्ट कॉलर बेल्ट प्रती गाय / म्हैस रु ५०००/- व एका गोठ्यासाठी गेटवे रु १०,०००/- (५० टक्के अनुदान तत्वावर) किमान ५ ते ४० गायी / म्हशी

                  लाभार्थी
                  सर्व प्रवर्गातील पशुपालक

                  पात्रता :
                  NDLM नोंद असलेल्या स्वतःच्या किमान ५ गायी / म्हशी

                  प्रकल्प किंमत:
                  १) गाय / म्हशीच्या गळ्यातील सेन्सर / स्मार्ट कॉलर बेल्ट प्रती गाय / म्हैस रु. ५०००/-
                  २) एका गोठ्यासाठी (किमान ५ ते ४० गायी/म्हशी) गेटवे रु. १०,०००/-

                  अनुदानाचे स्वरुप :
                  सर्व प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदान तत्वावर (प्रती लाभार्थी रु. १,००,०००/-च्या मर्यादेत)

                  आवश्यक कागदपत्रे
                  स्वतः च्या मालकीच्या ५ गायी / म्हशी असल्याबाबतचे स्थानिक पशुधन विकास अधिकारीचे प्रमाणपत्र
                  कार्यपध्दती:
                  १) निवड झाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत गायी / म्हशीसाठी सेन्सर / स्मार्ट कॉलर बेल्ट व गोठयासाठी गेटवे खरेदी करुन वापर सुरु करावा.
                  २) विहीत केलेल्या कालमर्यादेत गायी / म्हशीसाठी सेन्सर / स्मार्ट कॉलर बेल्ट व गोठयासाठी गेटवे खरेदी करुन वापर सुरु न केल्यास अशा लाभार्थ्याचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येवून, पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल
                  ३) गायी / म्हशीसाठी सेन्सर/स्मार्ट कॉलर बेल्ट व गोठ्यासाठी गेटवेचा वापर सुरु झाल्यानंतर कार्यक्षेत्रातील तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांनी कार्यक्षेत्रातील संस्था प्रमुखासह संयुक्तपणे तपासणी करुन तपासणी अहवाल (खरेदी पावती, छायाचित्र, लाभार्थ्यांचे बँकचे तपशील) जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांना १५ दिवसात सादर करावा.
                  ४) योजनेमध्ये निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करावयाची आहे.
                  ५) सदर अहवालानुसार जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांनी DBT व्दारे अनुदान हिस्सा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अदा करावा.
                  ६) योजनेच्या अटी शर्तीची पुर्तता करुन अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्याकडून घेण्यात यावे.

                  शासन निर्णय ०९.०३.२०२६

                   

                    • योजनेचे नाव :वराह पालन गट वाटप योजना

                    लाभाचे स्वरुप :
                    ५+१ वराह गट + विमा

                    लाभार्थी निकष:
                    लाभार्थी:सर्व प्रवर्गातील दारिद्रय रेषेखालील, भुमीहीन, अत्यल्प भुधारक, अल्प भुधारक, सुशिक्षीत बेरोजगार, महिला बचत गट (लाभ सर्वसाधारण लाभार्थी – ५० टक्के, अनुसूचित जाती जमाती- 75 टक्के)
                    लाभार्थी निकष: सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.
                    अ) भुमीहीन ब) अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंत भूधारक) क) अल्प भूधारक (१ ते २ हेक्टरपर्यंत भूधारक) ड) वनहक्क धारक इ) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते ड मधील)
                    वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के तसेच महिलांना ५० टक्के आरक्षण लागू राहील.

                    पात्रता:
                    पशुपालन व्यवसायाचे शासकीय / निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण (अर्ज करतांना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापुर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील)

                    गटाची किंमत
                    1. पशुधन खरेदी :
                    – प्रति मादी वराह – रु. २२,५००/-
                    – नर वराह – रु. २५,०००/-
                    2. विमा (३ वर्षांसाठी १२.७५ टक्के) : रु. १७,५३१/-
                    3. विक्री कर (१८ टक्के) : रु. ३,१५६/-
                    4. पशुधन खरेदी, विमा व विक्री कर एकूण : रु. १,५८,१८७/-
                    5. शेड, खाद्य, पाणी, उपकरणे व साहित्य (शेड वॉशर/स्प्रे पंप) : रु. ५०,०००/-
                    6. एकूण प्रकल्प किंमत : रु. २,०८,१८७/-

                    आवश्यक कागदपत्रे :
                    १. पशुपालन व्यवसायाचे शासकीय / निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे २ वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र
                    २. दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र,
                    ३. शेडसाठी जागा उपलब्ध असल्याचे तसेच वराह मोकाट सोडले जाणार नाही याबाबतचे स्वयंघोषणा पत्र.

                    शासन निर्णय ०९.०३.२०२६

                     

                      • योजनेचे नाव :राजे यशवंतराव होळकर महामेष योजने अंतर्गत मेंढी गट २० + १ मेंढी गट वाटप योजना

                      लाभाचे स्वरुप:
                      शासन निर्णय पविआ-२०१७/प्र.क्रं.६५/पदूम-३, दि.२ जून,२०१७ अन्वये राज्यस्तरीय योजनेतंर्गत राज्यामध्ये मेंढीपालन व्यवसायास चालना मिळण्याकरिता राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्यात येत आहे, या अंतर्गत ७५ % अनुदानावर २० +१ मेंढी गट वाटप करण्यात येत आहे.
                      • शासन निर्णयानुसार धनगर व तत्सम जमातीमधील समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या असलेला मागासलेपणा दूर करुन स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टीने मंडीपालानास प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान तत्वावर ६ मुख्य घटकासह नवीन योजना “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना” या नावाने सुरु करण्यात आली आहे.
                      • सदर योजनेत समाविष्ठ असलेल्या ६ घटकांसाठी घटकनिहाय लाभाच्यांची संख्या व आर्थिक मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे.
                      • सदर योजनेंतर्गत एकूण रु. ४४,५६,१२,३३८/- अनुदान वाटपासाठी व प्रशासकिय खर्च (१ टक्के) रु. ४४,५६,१२३/- असा एकूण ४५,०१,४९,२६९/- इतका निधी निर्धारित करण्यात आला आहे.\
                      • सदर योजनेत आतापर्यंत रु. ४४.२४ कोटी इतका निधी खर्च झाला आहे. त्यानुसार आर्थिक उद्दिष्ट पुर्ण झाले आहे.
                      • सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पीय भाषणात तत्कालीन अर्थमंत्री यांनी योजनेची फलश्रुती लक्षात घेऊन व्याप्ती वाढविण्याबाबत नंतर विचार करण्यात येईल, असे घोषित केले होते.
                      • तद्‌अनुषंगाने धनगर व तत्सम समाजास आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी व मेंढी पालनास प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान तत्वावर “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना” ही योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजना राविवितांना आलेला अनुभव व सदर योजनेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड, पुणे यांच्याकडे प्रतिक्षाधिन असलेल्या २५६९५ अर्जाची संख्या व उपलब्ध निधी विचारात घेऊन “राजे यशवंतराव शासन निर्णय क्रमांकः पवि-२०१४/प्र.क्र.६५/पदूम-३ होळकर महामेष योजना” पुढे चालू ठेवण्याची आवश्यकता विचारात घेऊन पुढील निर्णयास मान्यता देण्यात आली आहे.
                      • व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड, पुणे यांना वरील (ब) प्रमाणे कागदपत्रे सादर केल्यानंतर ७५ टक्के अनुदानाची रक्कम ७ दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेच्या (DBT) माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते.
                      • सदर योजनेतर्गत लाभार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड, पुणे यांच्या प्रक्षेत्रावरुन देण्यात येणा-या चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे/ बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व बावींचे लाभ पूर्वीप्रमाणेच थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेच्या (DBT) माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येतो.
                      • सदर योजने अंतर्गत वर्षनिहाय झालेला खर्च खालीलप्रमाणे आहे.
                      विचारात घेऊन “राजे यशवंतराव शासन निर्णय क्रमांकः पवि-२०१४/प्र.क्र.६५/पदूम-३ होळकर महामेष योजना” पुढे चालू ठेवण्याची आवश्यकता विचारात घेऊन पुढील निर्णयास मान्यता देण्यात आली आहे.
                      व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड, पुणे यांना वरील (ब) प्रमाणे कागदपत्रे सादर केल्यानंतर ७५ टक्के अनुदानाची रक्कम ७ दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेच्या (DBT) माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते.
                      • सदर योजनेतर्गत लाभार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड, पुणे यांच्या प्रक्षेत्रावरुन देण्यात येणा-या चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे/ बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व बावींचे लाभ पूर्वीप्रमाणेच थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेच्या (DBT) माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येतो.
                      • सदर योजने अंतर्गत वर्षनिहाय झालेला खर्च खालीलप्रमाणे आहे.
                      वर्ष २० +१ मेंढी गट वाटप संख्या (स्थायी) २० +१ मेंढी गट वाटप संख्या (स्थलांतरित)
                      २०१७-१८ १ ११४
                      २०१८-१९ १३० ३४८
                      २०१९-२० २१५ २०
                      २०२०-२१ ३०६ ४९३
                      २०२१-२२ ८२ ९६
                      २०२२-२३ ४९ १३
                      २०२३-२४ १३६ ११३
                      २०२४-२५ ११९ ४५
                      २०२५-२६ ४५० ४६३
                      एकूण १४८८ १७०५

                      शासन निर्णय ०९.०३.२०२६

                       

                        • योजनेचे नाव :मेंढपाळ कुटुंबांना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत चराई अनुदान देणे योजना

                        लाभाचे स्वरुप:
                        शासन निर्णय १. पविआ-१०१९/प्रक्र.२१६/पदूम-३, मुंबई दि.२०सप्टेंबर २०१९, २. शासन शुध्दीपत्रक क्रं. पविआ-२०२३/ प्रक्र.५५५/ पदूम-३, मुंबई दि.१४ मार्च २०२४ अन्वये राज्यस्तरीय योजनेंतर्गत राज्यातील भटक्या जमाती क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीतील मेंढपाळ कुटुंबांना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी चराई अनुदान देणे.
                        योजनेचे उद्देश :
                        • राज्यातील भटकंती करणाऱ्या धनगर व तत्सम जमातीतील पशुपालकांना पारंपरिक पद्धतीने करीत असलेल्या मेंढी/शेळीपालन या व्यवसाया पासून त्यांना शास्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देणे व त्याद्वारे त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचवण्यास मदत करणे.
                        • माहे जून ते सप्टेंबर या कालावधीत मेंढपाळ कुटुंबांना मेंढ्यांच्या चराईच्या अनुषंगाने येणाऱ्या अडीअडचणी/समस्या यावर मात करणे.
                        • राज्यातील मेंढ्यांच्या संख्येमध्ये सातत्याने होत असलेली घट थांबवणे किंबहुना त्यामध्ये वाढ करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
                        • राज्यातील मेंढी/शेळीपालन व्यवसायास चालना देऊन ग्रामीण रोजगार निर्मिती करणे.
                        • राज्यातील भटक्या जमाती क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीतील ज्या मेंढपाळ कुटुंबांकडे किमान २० मेंढ्या व १ मेंढानर एवढे पशुधन असणाऱ्या २०८३ कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधी साठी प्रती महा रु. ६०००/-असे एकूण २४०००/- चराई अनुदान वाटप करणे.

                        शासन निर्णय ०९.०३.२०२६