बंद

    “मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना” – जिल्हा वार्षिक योजना

    तारीख : 26/11/2026 -
    • योजनेचे नाव :दुधाळ गाय/म्हैस वाटप (1 / 2)

    योजनेचे स्वरूप व लाभ: या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दुभत्या गायी किंवा म्हशींचे गट वाटप केले जातात. यामध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत
    * १ दुभती गाय / म्हैस व ३ वर्षांचा विमा.
    * २ दुभत्या गायी / म्हशींचा गट व ३ वर्षांचा विमा.

    लाभार्थी व पात्रता निकष सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीमधील लाभार्थी निवड खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.
    * भुमीहिन (फक्त १ गाय / म्हैस गटासाठी).
    * अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंत)
    * अल्पभूधारक (१ ते २ हेक्टर).
    * महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते ड मधील)
    * विशेष आरक्षण: दिव्यांग व्यक्तींसाठी ५ टक्के, तसेच १ गाय / म्हैस गटासाठी महिलांना ५० टक्के आणि २ गाय / म्हैस गटासाठी ३० टक्के आरक्षण लागू राहिल.
    * 1 गाय / म्हैस यासाठी जमीनधारणेची आवश्यकता नाही.
    * २ गायी / म्हैस गटासाठी किमान १ एकर जमीन आवश्यक. मात्र, वनहक्क धारकांना ही अट लागू राहणार नाही.

    गटाची किंमत: १ जनावरासाठी अंदाजे १,१२,०३६ रुपये, तर २ जनावरांच्या गटासाठी २,२४,०७२ रुपये (विमा रक्कमेसह) खर्च अपेक्षित आहे.

    अनुदानाचे प्रमाण:
    * सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी: ५० टक्के.
    * अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी: ७५ टक्के अनुदान.

    शासन निर्णय ०९.०३.२०२६

     

      • योजनेचे नाव :शेळी/मेंढी गट वाटप (5+1 / 10+1)

      लाभाचे स्वरुप:
      १) ५+१ शेळी / मेंढी गट + विमा किंवा
      २) १०+१ शेळी / मेंढी गट + विमा

      लाभार्थी व पात्रता निकष
      लाभार्थी:
      सर्व प्रवर्गातील भुमीहीन, अत्यल्प भुधारक, अल्प भुधारक, महिला बचत गट
      पात्रता
      १) फक्त ५+१ शेळी / मेंढी गटासाठी जमीनीची अट लागू नाही.
      २) किमान १ एकर स्वतःची किंवा किमान ५ वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा असलेली जमीन, मात्र वनहक्क धारकांना ही अट लागू राहणार नाही.

      गटाची किंमत:
      १) ५+१ शेळी/मेंढी
      अ) पशुधन खरेदी
      १) प्रती शेळी / मेंढी – रु. १२,०००/-
      २) बोकड / मेंढा – रु. १५,०००/-
      ब) विमा: १२.७५%
      क) विक्री कर: १८%
      ड) ५+१ शेळी / मेंढी गटाची एकूण किंमत: रु. ८६,२८४/-
      २) १०+१ शेळी / मेंढी गटाची एकूण किंमत: रु. १,५५,३११/-

      अनुदानाचे प्रमाण:
      १) सर्वसाधारण लाभार्थी – ५० टक्के
      २) अनुसुचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी ७५ टक्के

      शासन निर्णय ०९.०३.२०२६

       

        • योजनेचे नाव :अंडी देणाऱ्या 500 सुधारित /देशी कुक्कुट पक्षांचे वाटप

        लाभाचे स्वरुप:
        अंडी देणाऱ्या १६-१८आठवडे वयाच्या ५०० सुधारित / देशी कुक्कुट पक्षी, अर्धबंदिस्त / पिंजरा गादी पध्दतीचे शेड, खाद्य, पाणी भांडी, एग्ज ट्रे, एग नेस्ट इ. आवश्यक साहित्य.

        लाभार्थी व पात्रता निकष
        लाभार्थी प्रवर्ग: सर्व प्रवर्गातील लाभार्थी
        लाभार्थी निकष: सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.
        अ) भूमीहीन
        ब) अत्यल्प भूधारक
        क) अल्प भूधारक
        ड) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते क मधील)
        वरील घटकांमध्ये दिव्यांग बांधवांसाठी ५ टक्के तसेच महिलांना ५० टक्के आरक्षण लागू राहील.

        गटाची किंमत:
        १) पक्षी किंमत – किमान १८० ते २०० अंडी उत्पादन देणारे ५०० पक्षी रु. ३५०/- प्रती पक्षी प्रमाणे
        २) २ महिन्याच्या खाद्यावरील खर्च (७.२ कि.ग्रॅ. प्रती पक्षी x रु. २७/- प्रती कि.ग्रॅ. प्रमाणे)
        ३) अर्धबंदिस्त / पिंजरा / गादी पध्दतीने संगोपन (प्रती पक्षी रु. १००)
        ४) खाद्य, पाणी भांडी, अंडी ठेवण्याकरीता ट्रे, एग नेस्ट इत्यादी आवश्यक साहित्य (प्रती पक्षी रु. २०/-)
        एकूण किंमत रु. ३,३२,२००/-

        अनुदानाचे प्रमाण:
        १. सर्वसाधारण लाभार्थी – ५० टक्के

        शासन निर्णय ०९.०३.२०२६

         

          • योजनेचे नाव :वैरण विकास योजना

          लाभाचे स्वरुप:
          चारा बियाण्यांचा / ठोंबाचा पुरवठा

          लाभार्थी व पात्रता निकष
          सर्व प्रवर्गातील शेतकरी, शेतकरी समुह गट
          लाभार्थी निकष:
          १) वैयक्तिक शेतकऱ्यासाठी १ हे. वैरण उत्पादन घेण्यासाठी
          २) वनहक्क धारक
          ३) नोंदणीकृत शेतकरी समुह गट
          पात्रता
          अ) वैयक्तिक शेतकरी –
          १) स्वतःची जमीन व सिंचन सुविधा
          २) स्वतःचे किमान ३ ते ४ पशुधन
          आ) शेतकरी समुह गट

          अनुदानाचे स्वरुप
          १) वैयक्तिक लाभार्थी १०० टक्के अनुदान १ हेक्टरसाठी रु. ४०००/-
          २) शेतकरी समुह गट ५ हेक्टर व रु. २००००/- च्या मर्यादेत

          आवश्यक कागदपत्रे
          १) स्वतः च्या नावे ७/१२ उतारा
          २) वनहक्क जमीन धारकांसाठी ७/१२ उताऱ्यावर “इतर अधिकार” मध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसुची “जे” प्रमाणपत्र,
          ३) किमान ३ ते ४ पशुधन
          ४) नोंदणीकृत प्रमाणपत्र (शेतकरी समुह गट)

          शासन निर्णय ०९.०३.२०२६

           

            • योजनेचे नाव :हायड्रोफोनिक तंत्राव्दारे चारा उत्पादन योजना

            लाभार्थी:
            अत्यल्प भुधारक, अल्प भुधारक, वनहक्क धारक, महिला बचत गट

            लाभार्थी निकष:
            सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.
            अ) अत्यल्प भूधारक
            ब) अल्प भूधारक
            क) वनहक्क धारक
            ड) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते क मधील)
            वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी ५,महिलांना ३० टक्के आरक्षण लागू राहील.
            पात्रता
            स्वतःचे मालकीची किमान ५ मोठे पशुधन / १० शेळ्या किंवा मेंढ्या असाव्यात.

            अनुदानाचे स्वरुप:
            प्रकल्प चालु झाल्यानंतर
            १) सर्वसाधारण प्रवर्ग – ५०% अनुदान
            २) अनुसूचित जाती/जमाती-७५ % अनुदान लाभाचे स्वरुप: हायड्रोफोनिक तंत्राव्दारे चारा उत्पादनासाठी आवश्यक असणारी खालील साधन सामुग्री अनुदान तत्वावर देणे
            १. रॅक फ्रेम – ५ नग – रुपये १०,०००/-
            २. प्लास्टिक ट्रे (२५ नग) – रुपये ४,५००/-
            ३. पाण्याची टाकी व पाइपिंग – १ नग – रुपये ५,०००/-
            ४. पंप व मिस्टिंग / सिंचन यंत्रणा – १ नग – रुपये ५,५००/-
            ५. ग्रीनहाऊस / शेडनेट – १ नग – रुपये १०,०००/-
            ६. इतर साहित्य (उपकरणे, साधने व साठवणूक व्यवस्था) – रुपये ५,०००/-
            एकूण रक्कम – रुपये ४०,०००/-

            शासन निर्णय ०९.०३.२०२६

             

              • योजनेचे नाव :मिनी टीएमआर उपकरण खरेदीसाठी अनुदान योजना

              लाभाचे स्वरुप:
              पशुपालकांना ३०० किलो प्रती बॅच क्षमता असलेल्या मिनी टीएमआर उपकरण खरेदीसाठी अनुदान

              लाभार्थी
              सर्व प्रवर्गातील लाभार्थी

              लाभार्थी निकष:
              सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.
              अ) भूमीहीन
              ब) अत्यल्प भूधारक
              क) अल्प भूधारक
              ड) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते क मधील)
              वरील घटकांत दिव्यांगांसाठी ५ तसेच महिलांना ५० % आरक्षण लागू राहील. महिला उपलब्ध न झाल्यास पुरुष प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.

              पात्रता
              स्व:मालकीची किमान १० मोठे पशुधन / ५० शेळ्या किंवा मेंढ्या असाव्यात.

              उपकरणाची किंमत:
              रु. ४,४०,०००/- प्रती मशीन

              अनुदानाचे स्वरुप:
              * सर्वसाधारण लाभार्थी – ५० टक्के
              * अनुसुचित जाती / जमाती प्रवर्गातील लाभार्थी: ७५%

              आवश्यक कागदपत्रे
              १) किमान १० मोठे पशुधन / ५० शेळ्या किंवा मेंढ्या असल्याबाबतचे स्थानिक पशुधन विकास अधिकारी यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र
              २) दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र
              ३) बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र

              शासन निर्णय ०९.०३.२०२६

               

                • योजनेचे नाव :पशुपालकांना कडबाकुट्टी यंत्र खरेदीसाठी अनुदान योजना

                लाभाचे स्वरुप:
                पशुपालकांना कडबाकुट्टी यंत्र खरेदीसाठी अनुदान
                लाभार्थी: सर्व प्रवर्गातील लाभार्थी

                लाभार्थी निकष:
                सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.
                अ) भूमीहीन
                ब) अत्यल्प भूधारक
                क) अल्प भूधारक
                ड) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते क मधील)
                वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के तसेच महिलांना ५० टक्के आरक्षण लागू राहील. महिला लाभार्थी उपलब्ध न झाल्यास पुरुष प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.

                पात्रता
                स्वतःचे मालकीची किमान २ दुधाळ जनावरे/१० शेळ्या/मेंढ्या उपकरणाची किंमत
                रु. ३०,०००/- प्रती कडबा कुट्टी यंत्र खरेदीच्या मर्यादेत

                अनुदानाचे स्वरुप
                १) सर्वसाधारण लाभार्थी – ५० टक्के
                २) अनुसुचित जाती/जमाती प्रवर्गातील लाभार्थी ७५ टक्के

                आवश्यक कागदपत्रे
                १) किमान २ दुधाळ पशुधन / १० शेळ्या किंवा मेंढ्या असल्याबाबतचे स्थानिक पशुधन विकास अधिकारीचे प्रमाणपत्र
                २) दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र
                ३) बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र

                शासन निर्णय ०९.०३.२०२६

                 

                  • योजनेचे नाव :गायी / म्हशी मध्ये भूण प्रत्यारोपण करणेसाठी अनुदान देणे योजना

                  लाभाचे स्वरुप:
                  गायी म्हशी / मध्ये भृण प्रत्यारोपण करणेसाठी अनुदान देणे

                  लाभार्थी
                  सर्व प्रवर्गातील पशुपालक

                  लाभार्थी निकष:
                  सर्व प्रवर्गातील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.
                  अ) भूमीहीन ब) अत्यल्प भूधारक क) अल्प भूधारक
                  ड) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते क मधील)
                  वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के आरक्षण लागू राहील.

                  पात्रता :
                  स्वतःची भारत पशुधन पोर्टलवर नोंद असलेली गाय / म्हैस असलेले पशुपालक, गोशाळा

                  एका भृण प्रत्यारोपणाची किंमत:
                  रु. २४,०००/- (उच्च अनुवंशीक वंशावळीचे यशस्वी भृण प्रत्यारोपणद्वारे निश्चित गर्भधारणा करणेसाठी येणारा खर्च रु.८०००/- याप्रमाणे ३ प्रयत्नात यशस्विता गृहीत धरण्यात आली आहे)

                  अनुदानाचे स्वरुप :
                  सर्व प्रवर्गासाठी १०० टक्के
                  (मात्र भृण प्रत्यारोपण करण्यासाठीचे विहीत करण्यात आलेले सेवाशुल्क पशुपालकाने अदा करणे आवश्यक)

                  आवश्यक कागदपत्रे
                  १) स्वमालकीची गाय म्हैस / असल्याबाबतचे स्थानिक पशुधन विकास अधिकारीचे प्रमाणपत्र
                  २) गोसेवा आयोगाकडे नोंदणी असल्याचे प्रमाणपत्र (गोशाळेसाठी)
                  ३) दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र
                  ४) बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र
                  ५) उच्च अनुवंशिक वंशावळीचे भृण प्रत्यारोपण करण्यास इच्छुक असल्याबाबतचे व त्याबाबतच्या सर्व अटी शर्तीचे पालन करण्यास तयार असल्याबाबतचे बंधपत्र.

                  शासन निर्णय ०९.०३.२०२६

                   

                    • योजनेचे नाव :सुधारित / देशी पारड्याची जोपासना अंतर्गत कालवडी / पारड्यांना पशु खाद्य पुरवठा (५०% अनुदान) योजना

                    लाभार्थी
                    सर्व प्रवर्गातील भुमीहिन, अल्प भुधारक व अत्यल्प भुधारक पशुपालक

                    अनुदानाचे स्वरुप :
                    सर्व प्रवर्गासाठी – ५०% अनुदान

                    कार्यपध्दती:
                    १) लाभार्थ्याने ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
                    २) कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय संस्था प्रमुखाने लाभार्थ्याकडील कालवड / पारडीस एनडीएलएम प्रणालीवरील नोंदीनुसार वयाची खातरजमा करुन योजनेचा लाभ देण्यात यावा.
                    ३) एका कुटुंबातील एक कालवड / पारडी पात्र असेल.
                    ४) जिल्हा निवड समितीमार्फत लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी.
                    १. ४ था महिना – दैनिक खाद्य गरज: १ कि.ग्रॅ. – मासिक पुरवठा: ३० कि.ग्रॅ.
                    २. ५ वा महिना – दैनिक खाद्य गरज: १.५ कि.ग्रॅ. – मासिक पुरवठा: ४५ कि.ग्रॅ.
                    ३. ६ वा महिना – दैनिक खाद्य गरज: १.७५ कि.ग्रॅ. – मासिक पुरवठा: ५२.५ कि.ग्रॅ.
                    ४. ७ ते १८ महिने – दैनिक खाद्य गरज: २ कि.ग्रॅ. – मासिक पुरवठा: ७२० कि.ग्रॅ.
                    ५. १९ ते ३२ महिने (कालवड) – दैनिक खाद्य गरज: २.५ कि.ग्रॅ. – मासिक पुरवठा: १,०५० कि.ग्रॅ.
                    ६. १९ ते ४० महिने (पारडी) – दैनिक खाद्य गरज: २.५ कि.ग्रॅ. – मासिक पुरवठा: १,६५० कि.ग्रॅ.

                    शासन निर्णय ०९.०३.२०२६

                     

                      • योजनेचे नाव :नर पारडू (रेडकू) संगोपन व संवर्धन प्रोत्साहन योजना

                      लाभाचे स्वरुप:
                      एका नर पारडू / रेडक्याच्या संगोपनासाठी रु. ६,०००/- चे अर्थसहाय्य (खाद्य, औषधे व देखभालीसाठी).

                      लाभार्थी
                      सर्व प्रवर्गातील पशुपालक

                      पात्रता:
                      ज्या पशुपालकाकडे NDLM वर स्वतःच्या नावावर नोंद असलेले पारडू / रेडकू असे शेतकरी (एका पशुपालकास कमाल १० पारडू / रेडकूच्या मर्यादेत)

                      अनुदानाचे स्वरुप :
                      सर्व प्रवर्गासाठी एका नर पारडू / रेडक्याच्या संगोपनासाठी प्रती पशु रु.६,०००/- चे अर्थसहाय्य अनुदान २ टप्प्यात विभागून दिले जाईल.
                      1 ला हप्ता ५०%: पारडू/रेडक्याचे वय ६ महिने पूर्ण झाल्यावर
                      २ रा हप्ता (५०%): पारडू / रेडक्याचे वय १ वर्ष पूर्ण झाल्यावर

                      आवश्यक कागदपत्रे
                      १) स्वमालकीचे पारडू / रेडकू असल्याबाबतचे स्थानिक पविअ यांचे प्रमाणपत्र
                      २) पारडू / रेडकू किमान एक वर्षापर्यंत सांभाळण्याबाबत पशुपालकाचे बंधपत्र.

                      कार्यपध्दती:
                      १) निवड झाल्यानंतर १ महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्याने आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी.
                      २) पारडू / रेडकू यांचा तपशील कार्यक्षेत्रातील पशुवैद्यक अधिकाऱ्याने स्वतंत्रपणे ठेवावा.
                      ३) विहीत केलेल्या कालमर्यादेत लाभार्थ्याने आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्यास अशा लाभार्थ्याचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येवून, पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल.
                      ४) तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांनी अनुदान वितरणापुर्वी कार्यक्षेत्रातील संस्था प्रमुखासह संयुक्तपणे तपासणी करुन तपासणी अहवाल जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांना १५ दिवसात सादर करावा.
                      ५) पारडू / रेडकू किमान १ वर्षापर्यंत सांभाळण्याबाबत बंधपत्र घेण्यात यावे.

                      शासन निर्णय ०९.०३.२०२६

                       

                        • योजनेचे नाव :पशुपालक/शेतकऱ्यांना देशी बैल जोडी खरेदी करिता अनुदान वाटप योजना

                        लाभाचे स्वरुप:
                        बैल जोडी खरेदी नंतर
                        सर्वसाधारण प्रवर्ग – ५०% अनुदान (रु. ८४,०२७/-)
                        अनुसूचित जाती / जमाती-७५ % अनुदान (रु. १,२६,०४०/-)

                        लाभार्थी
                        सर्वसाधारण प्रवर्ग: ५०% अनुदान (रु. ८४,०२७/-)
                        अनुसूचित जाती / जमाती: ७५ % अनुदान (रु. १,२६,०४०/-)
                        सर्व प्रवर्गातील अल्प / अत्यल्प भुधारक शेतकरी, वनहक्क धारक, नोंदणीकृत उसतोड कामगार

                        लाभार्थी निकष:
                        सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.
                        अ) भुमीहीन ब) अत्यल्प भूधारक क) अल्प भूधारक ड) वनहक्क धारक
                        इ) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते ड मधील)
                        वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी ५ तसेच महिलांना ५० % आरक्षण लागू राहील

                        पात्रता:
                        १) स्वतःच्या नावावर ७/१२ उतारा अल्प / अत्यल्प भुधारक शेतकरी असल्याचा, मात्र वनहक्क धारकाना ही अट लागू राहणार नाही.
                        २) भुमीहीन असल्यास उसतोड महामंडळाकडे नोंदणी असलेला कामगार (वनहक्क धारक वगळून)
                        देशी बैल जोडीची किंमत
                        पशुपालक / शेतकऱ्यांना देशी बैल जोडी खरेदी करिता अनुदान
                        १) पशुधन खरेदी- रु. १,५०,०००-/
                        २) विमा १०.२०% (अधिक १८% GST)- रु. १८,०५६ -/ एकूण-रु. १,६८,०५६/-

                        अनुदानाचे स्वरुप :
                        १. सर्वसाधारण लाभार्थी – ५० टक्के
                        २. अनुसुचित जाती/जमाती प्रवर्ग लाभार्थी -७५ टक्के अनुदान देय असेल.

                        शासन निर्णय ०९.०३.२०२६