“मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना” फिरती पशुचिकित्सा पथके.
-
मा. मंत्री, वित्त महाराष्ट्र शासन यांनी 2017 रोजीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात 349 फिरत्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाची स्थापना करण्याची घोषणा केली होती. त्यास अनुसरून योजने अंतर्गत राज्यातील 349 ग्रामीण तालुक्यांमध्ये स्थापन करावयाच्या फिरत्या पशुचिकीत्सा पथकांपैकी प्रथम टप्प्यात 80 तालुक्यांमध्ये नवीन 80 फिरते पशुचिकीत्सा पथके स्थापन करण्यास मान्यता दिली. पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी शा. नि. पविआ-1017/प्र.क्र. 87/पदुम-3, मुंबई-32, दि.25.02.2019 नुसार राज्यातील 32 जिल्ह्यातील 73 तालुक्यांमध्ये सुसज्ज वाहनांसह फिरती पशुवैद्यकीय पथके कार्यरत आहेत.