मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना
मा. मंत्री, वित्त महाराष्ट्र शासन यांनी 2017 रोजीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात 349 फिरत्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाची स्थापना करण्याची घोषणा केली होती. त्यास अनुसरून मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजने अंतर्गत राज्यातील 349 ग्रामीण तालुक्यांमध्ये स्थापन करावयाच्या फिरत्या पशुचिकीत्सा पथकांपैकी प्रथम टप्प्यात 81 तालुक्यांमध्ये नवीन 81 फिरते पशुचिकीत्सा पथके स्थापन करण्यास मान्यता दिली. उपलब्ध तरतुदीस अधीन राहून 73 वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत. वाहन चालक तथा मदतनीस बाह्यस्त्रोताद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच मानधन पध्दतीने कंत्राटी पध्दतीने 51 सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सेवा उपलब्ध करुन घेण्यात आलेल्या आहेत. दि. १५/०१/२०२१ व २९/०४/२०२१ रोजीच्या शासन निर्णयाने स्थाननिश्चिती झालेल्या ठिकाणी सदरची 73 फिरती पशुचिकित्सा पथके कार्यरत आहेत.सदर योजना कार्यान्वीत करण्यासाठी 1962 या टोल फ्री क्रमांकासह कॉल सेंटर उभारणीसाठी इंडसइंड बँकेची उपकंपनी भारत फायनान्स इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीबरोबर सामंजस्य करार करून पशुसंवर्धन आयुक्तालय औंध, पुणे-६७ येथे स्थापन करण्यात आलेले कॉल सेन्टर कार्यान्वित करण्यात आले आहे.
लाभार्थी:
--
फायदे:
--
अर्ज कसा करावा
—