बंद

    राष्ट्रीय पशुधन अभियान

    • तारीख : 01/01/2021 -

    केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत खालील प्रमाणे विविध 3 उप-अभियानांचा समावेश केलेला आहे.

    • पशुधन आणि कुक्कुट प्रजाती विकास उप-अभियान: या उप-अभियानातून उद्योजकता विकासावर आणि कुक्कुट, मेंढ्या, शेळी आणि वराह यांच्या प्रजाती सुधारण्यावर भर देण्यात आलेला आहे.
    • पशु खाद्य व वैरणउप-अभियान या उप- अभियानातून चारा बियाणे साखळी मजबूत करण्याकरिता उत्पादनासाठी आवश्यक प्रमाणित चारा बियाणांची उपलब्धता सुधारण्यासाठी आणि चारा ब्लॉक/हे बेलिंग/सायलेज युनिट्सच्या स्थापनेसाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

    • नाविन्यपुर्ण योजना व विस्तार उप-अभियान : मेंढ्या, शेळी, वराह आणि चारा आणि चारा क्षेत्र, विस्तार उपक्रम, पशुधन विमा आणि नवोपक्रमाशी संबंधित संशोधन आणि विकास करणाऱ्या संस्था, विद्यापीठे, संस्थांना प्रोत्साहन देणे हे उप-मिशनचे उद्दिष्ट आहे.

    केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान या अंतर्गत खालील योजनांचा समावेश होतो.

    1. उपयोजना – ग्रामीण कुक्कुट पालनातुन प्रजाती विकासाद्वारे उद्योजगता विकास
    2. योजना कालावधी :

      सन २०१४ -२०१५, सन २०२१-२२ पासून सुधारित स्वरुपात

      लाभार्थी :

      वैयक्तिक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, सामुहिक दायित्व गट व नियम ८ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, लाभार्थी अर्ज व निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने www.udyamimitra.inया पोर्टल वर

      लाभ-

      कमीत कमी 1,000 अंड्यावरील (लो इनपुट तंत्रज्ञान) कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन व अंडी उबवणी केंद्राची स्थापना, एक वेळ 50 टक्के भांडवली अनुदान अधीकतम मर्यादा रु. 25.00 लक्ष प्रती युनिट (दोन समान हप्त्यांमध्ये) (उर्वरीत 50 टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी स्वहिस्सा)

    3. उपयोजना – ग्रामीण शेळी मेंढी पालनातुन प्रजाती विकासाद्वारे उद्योजगता विकास
    4. योजना कालावधी:

      सन २०१४ -२०१५, सन २०२१-२२पासून सुधारित स्वरुपात

      लाभार्थी :

      वैयक्तिक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, सामुहिक दायित्व गट व नियम ८ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, लाभार्थी अर्ज व निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने www.udyamimitra.inया पोर्टल वर

      लाभ-

      500 शेळ्या/ मेंढ्या + 25 बोकड / नर मेंढे गटाची स्थापना करणे (उर्वरीत 50 टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी स्वहिस्सा) सर्व प्रवर्गांसाठी, 50 टक्के भांडवली अनुदान रु. 50.00 लक्ष (दोन समान हप्त्यांमध्ये), छोटे गट (400+20, 300+15, 200+10, 100+5) नुसार अनुषंगिक अनुदान ( रु. ४० लाख, ३० लाख, २० लाख, १० लाख) उपलब्ध

    5. उपयोजना – वराहपालनद्वारे उद्योजगता विकास
    6. योजना कालावधी:

      सन २०१४ -२०१५, सन २०२१-२२पासून सुधारित स्वरुपात

      लाभार्थी :

      वैयक्तिक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, सामुहिक दायित्व गट व नियम ८ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, लाभार्थी अर्ज व निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने www.udyamimitra.inया पोर्टल वर

      लाभ-

      सर्व प्रवर्गांसाठी -100 मादी + 10 नर वराह गटाची स्थापना करणे, एक वेळ 50 टक्के भांडवली अनुदान रु. ३० लक्ष, छोटे गट 50 मादी+5 नर नुसार रु. १५.00 लक्ष अनुदान (उर्वरीत 50 टक्के बँके चे कर्ज अथवा लाभार्थी स्वहिस्सा)

    7. उपयोजना- पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास
    8. योजना कालावधी:

      सन २०२१-२२पासून सुधारित स्वरुपात

      लाभार्थी :

      वैयक्तिक उद्योजक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, सामुहिक दायित्व गट व नियम ८ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, लाभार्थी अर्ज व निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने www.udyamimitra.inया पोर्टल वर

      लाभ-

      मुरघासबेलर, वैरणीच्या विटा आणि टी.एम.आर निर्मीती करीता दोन टप्प्यांमध्ये अनुदान सर्व प्रवर्गांसाठी, प्रकल्पकिंमतीच्या ५० टक्के रु. ५०.०० लक्ष पर्यंत

    महत्त्वाची कागदपत्रे
    अनु. क्र विषय येथे वाचा
    1 ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वे
    ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वे पहा(1.6 एमबी)
    2 वारंवार विचारले जाणारे प्रश्न
    वारंवार विचारले जाणारे प्रश्न पहा(87 केबी)
    3 केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान: अनुदान वितरणाबाबत
    केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान: अनुदान वितरणाबाबत पहा(521 केबी)
    4 अर्जाचा नमुना
    अर्जाचा नमुना पहा(418 केबी)
    5 कागदपत्रांची यादी
    कागदपत्रांची यादी पहा(304 केबी)

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ऑनलाईन पद्धतीने