उत्पादक भागीदारी उपप्रकल्प
प्रकल्पाचे नाव : मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प
योजनेचे नाव : उत्पादक भागीदारी उपप्रकल्प
(खरेदीदार आणि शेतक-यांच्या संस्था यांच्यातील भागीदारी उपप्रकल्प)
योजना सुरु : १५ डिसेंबर २०२०
योजना समाप्ती : —-
तारीख :
क्षेत्र :
शेळी, शेळीचे मांस व शेळीचे दूध आणि परसातील कुक्कुट पालनाद्वारे उत्पादित अंडी या क्षेत्रात पशुसंवर्धन विषयक मूल्य साखळी विकसीत करणे.
लाभार्थी :
शेतकरी उत्पादक कंपनी
लाभ :
शेतकरी उत्पादक कंपनीने ज्या खरेदीदाराबरोबर करार केला आहे, त्या खरेदीदाराच्या खरेदीचे निकष पूर्ण करण्यासाठी आवश्यक अशा गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी स्मार्ट प्रकल्पातून ६० टक्के अनुदान मिळेल.उदा.- शेडचे बांधकाम, शेळ्याचे टॅगिंग, सभासदाकडून शेळ्या गोळा करण्यासाठी/ अंडी गोळा करण्यासाठी वाहन, वैरणीसाठी बेलर मशीन, उपकरणे ईत्यादी पायाभूत सुविधा साठी अनुदान मिळेल.
अर्ज कसा करावा :
- शेतकरी उत्पादक कंपनी कायदेशीरित्या नोंदणीकृत असावी.
- संस्थेचे सनदी लेखापालाव्दारे (सीए) लेखापरीक्षण केलेले असावे.
- शेतकरी उत्पादक कंपनीचे किमान २५० भागधारक / सदस्य असणे आवश्यक आहे.
- संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालात लक्षणीय लेखाआक्षेप नसावेत. संस्था कोणत्याही कर्जाची थकबाकीदार नसावी.
- मागील ३ वर्षापैकी एका वर्षात किमान रुपये ५.०० लाखापेक्षा जास्त उलाढाल सनदी लेखापालाच्या (सीए) लेखापरीक्षण अहवालात असावी.
- खरेदीदाराबरोबर सामंजस्य करार केलेला असला पाहिजे.
- हे निकषपुर्ती करणाऱ्या संस्थेने उपरोक्त कागदपत्रे संबधित जिल्ह्याच्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात सादर करावेत.
(शेतकरी उत्पादक कंपनीच्या भागधारकांची नोंदणी कंपनी निबंधकाकडे – रजिस्ट्रार ऑफ कंपनीज-आरओसी झालेली असावी)
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे