बंद

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी अर्ज करताना बारंवार विचारले जाणारे प्रश्न –

  1. राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजे नेमके काय ?
  2. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागा मार्फत कुक्कुट, शेळी-मेंढी, वराह पालन तसेच वैरण विकास कार्यक्रमाअंतर्गत उद्योजकता विकासाठी राष्ट्रीय पशुधन अभियान हि योजना राबवीली जात आहे.

  3. राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेची मुख्य उद्दिष्ट काय आहेत ?
  4. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे रोजगार निर्मिती करणे, उद्योजकता विकास करणे आणि पशूंची उत्पादकता वाढवणे याबरोबरच या कार्यक्रमांतर्गत एका छत्रा खाली मांस, बकरीचे दूध, लोकर, अंडी यांचे उत्पादन वाढवणे, वैरणीची उपलब्धता वाढवणे, पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमास प्रोत्साहन देणे.

    असंघटित क्षेत्रातील उत्पादनांच्या विक्री करता आणि त्यांना चांगल्या दर्जाचा कच्चामाल उपलब्ध होण्याकरिता संघटित क्षेत्रांची जोडून उद्योजकता विकास साधने ही या मागची मुख्य संकल्पना आहे.

  5. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेसाठी कोण कोण अर्ज करु शकतात ?
  6. या योजनांसाठी कोणतीही व्यक्ती एफपीओ/एफसीओएस/एसएचजी/जेएलजी/ कलम ८ अंतर्गत नोंदणी असलेल्या कंपन्या अर्ज सादर करू शकतात.

  7. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर लाभार्थीस मिळणारे फायदे काय आहेत ?
  8. अर्जदारास सर्व योजनांसाठी प्रकल्प मूल्याच्या ५० टक्के अनुदान देय आहे. अनुदानाची कमाल मर्यादा रु.२५ लक्ष ते रु. ५० लक्ष आहे.

    मिळाणारे अनुदान –

    1. कुक्कुट अनुदान – रु. २५ लक्ष
    2. शेळी-मेंढी अनुदान – रु. ५० लक्ष
    3. वराह अनुदान – रु. ३० लक्ष
    4. वैरण विकास अनुदान – रु. ५० लक्ष

    जमीन खरेदी, भाडे, गाडी खरेदी (वैयक्तीक किंवा ऑफीससाठी) यास्तव अनुदान देय असणार नाही.

  9. अनुदाना व्यतीरीक्त रक्कमेबाबत अर्जदाराने कशे नियोजन करावे ?
  10. प्रकल्प प्रस्ताव रकमेच्या प्रकल्पाचा एकूण खर्च कमीत कमी दहा टक्के रक्कम अर्जदाराकडे स्वहिस्सा म्हणून आवश्यक आहे. व उर्वरित रक्कम बँक कर्ज स्वरूपात उपलब्ध करून घ्यावयाची आहे. अर्जदार बँकेकडून कर्ज घेण्यास इच्छुक नसेल व त्या संपूर्ण लाभार्थी हिस्सा स्वतः भरणे शक्य असेल तर त्याने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना मधील परिशिष्ट ७ मध्ये परफॉर्मा बँक हमी व परिशिष्ट ८ नुसार बँक हमी सादर करण्यासाठी कार्यप्रदर्शन हे ऑनलाईन अर्ज करताना सादर करावयाचे आहेत.

  11. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष –
  12. या योजनेसाठी अर्ज सादर करताना अर्जदाराने स्वतः किंवा त्यांच्याकडील तज्ञ व्यक्तीने प्रकल्पाशी संबंधित प्रशिक्षण तसेच अनुभव घेतलेला असणे आवश्यक आहे. प्रकल्पासाठी स्वतःची किंवा भाडेतत्त्वाची जमीन आवश्यक आहे. जसे की शेळी मेंढी प्रकल्पासाठी अर्ज सादर करताना आवश्यक जागेचा तपशील किंवा प्रति पशुपक्षी यासाठी लागणाऱ्या जागेचा तपशील मार्गदर्शक सुचनांमधील परिशिष्ट १ परिशिष्ट २ परिशिष्ट ३ परिशिष्ट ४ मध्ये दिलेला आहे. सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये •अर्जदाराने पशु पक्षांची ब्रीड नमूद करावी यासाठी सूचक यादी मार्गदर्शक सूचनांच्या परिशिष्ट ५ व परिशिष्ट ६ मध्ये माहितीस्तव दिलेली आहे. अर्जदाराचे खाते शेड्युल बँक मध्ये असणे आवश्यक आहे. केवायसी साठी आवश्यक कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे.

  13. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
  14. इच्छुक अर्जदार राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेसाठी www.nlm.udyamimitra.in या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करु शकतो.

  15. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेसाठी ऑफलाईन काही कागदपत्र देण्याची आवशकता आहे का ?
  16. ऑफलाईन कागदपत्र देण्याची गरज नाही. ऑनलाईन पोर्टलवर अर्जासोबत कागदपत्र सादर करावेत.

  17. अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर अर्जाच्या सद्यस्थितीबाबत कसे कळेल ?
  18. पोर्टलच्या उजव्या बाजुस असलेल्या ट्रॅक स्थिती टॅब वरुन अर्जदारास सद्यस्थितीबाबत कळेल.

  19. अर्ज करताना नोंदणी करावि लागेल का ?
  20. हो. अर्ज करताना मोबाईल नंबर वरुन नोंदणी करावी लागेल. मोबाईल नंबर दिल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर वर ओ.टी.पी. प्राप्त होईल.

  21. अर्ज करताना कोणते कागदपत्र ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावयाचे आहेत ?
  22. अर्ज सादर करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे-

    1. स्वहिसा भांडवल पुरावा
    2. प्रकल्पाशी निगडीत सर्व शेतक-यांची यादी
    3. वास्तव्य पुरावा
    4. तीन वर्षाचा ऑडिट रिपोर्ट लागू असल्यास
    5. मागील तीन वर्षाचा आयकर विवरणपत्र लागू असल्यास
    6. मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट
    7. पॅन कार्ड
    8. आधार कार्ड
    9. जात प्रमाणपत्र लागू असल्यास
    10. प्रशिक्षण प्रमाणपत्र
    11. अनुभव प्रमाणपत्र
    12. अर्जदाराचा फोटो
    13. सविस्तर प्रकल्प अहवाल

  23. कर्जासाठी कोणत्या बॅंकांना संपर्क करावा ?
  24. अर्जदार कर्ज कोणत्याही शेड्युल्ड बॅंक किंवा वित्त संस्थेकडुन घेवु शकतो. अर्जदार अर्ज करताना ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या बॅंकेच्या ड्रॉप डाउन यादीतुन इच्छुक बॅंक निवडु शकतो.

  25. एकदा अर्ज केल्यानंतर माझ्या अर्जाचे काय होते ?
  26. अर्ज राज्य अंमलबजावणी यंत्रणेकडुन कर्ज मंजुरी देणा-या बॅंकेस व तद्नंतर केंद्र शासनास सादर केला जातो.

  27. अनुदान कशा प्रकारे वितरीत केले जाते ?
  28. अनुदान दोन समान हप्त्यांमध्ये वितरीत केले जाते. अनुदानाचा प्रथम हप्ता प्रकल्पाच्या सुरुवातीला व दुसरा हप्ता प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर व राज्य अंमलबजावणी यंत्रणेने त्याची खात्री केल्यानंतर वितरीत केला जातो.

  29. बॅंकेस संपार्श्विक म्हणुन काय द्यावे लागेल ?
  30. सदर बाब ही त्या त्या बॅंकेवर अवलंबुन आहे.

  31. व्याज दर काय असेल ?
  32. सदर बाब ही त्या त्या बॅंकेवर अवलंबुन आहे.

    राष्ट्रीय पशुधन अभियान योजने अंतर्गत विविध प्रकल्प कोणते आहेत ?

    1. कुक्कुटपालनाद्वारे उद्योजकता विकास अंतर्गत अर्जदाराने अर्ज सादर करताना कमीत कमी १००० + १०० अंड्यावरील (लो इनपुट तंत्रज्ञान )कुकुट पक्षांचे संगोपनासाठी अर्ज सादर करावा. यामध्ये कुक्कुट पक्षांचे संगोपन व अंडी उबवणी केंद्राची स्थापना करणे अपेक्षीत आहे.
    2. शेळी मेंढी पालना द्वारे उद्योजकता विकास अंतर्गत अर्जदाराने अर्ज सादर करताना शेळी-मेंढीचे युनिट किमान मर्यादा १०० मादी + ५ नर ते कमाल मर्यादा ५०० मादी + २५ नर यासाठी अर्ज सादर करायचा आहे.
    3. वराहपालनाद्वारे उद्योजकता विकास अंतर्गत अर्जदाराने अर्ज सादर करताना कमाल मर्यादा ५० युनिट मादी + ५ नर ते १०० मादी + १० नर यासाठी अर्ज सादर करायचा आहे.
    4. पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास या योजनेद्वारे अर्जदारास मुरघास बेलर, वैरणच्या विटा आणि टोटल मिक्स रेशन निर्मिती करता अर्ज सादर करायचा आहे.

  33. कुक्कुटपालनाद्वारे उद्योजकता विकास अंतर्गत अनुदानासाठी पात्र वस्तू
  34. पेरेंट लेयर फार्म (अनुदानासाठी पात्र वस्तू)

    1. शेडचे बांधकाम
    2. इलेक्ट्रीकब्रुडर
    3. चीकफीडर
    4. चीकड्रींकर
    5. ॲडल्टफीडर

    हॅचरीबील्डींग (अनुदानासाठी पात्र वस्तू)

    1. शेडचेबांधकाम
    2. इनकुबेटर
    3. हॅचर
    4. जनरेटर

    मदरयुनीट (अनुदानासाठी पात्र वस्तू)

    1. शेडचेबांधकाम
    2. इलेक्ट्रीकब्रुडर
    3. चीकफीडर
    4. चीकड्रींकर

  35. शेळी मेंढी पालनाद्वारे उद्योजकता विकास अंतर्गत अनुदानासाठी पात्र वस्तू
    1. शेडचे बांधकाम
    2. करडू व आजारी शेळयांचे शेड
    3. शेळीचीकिंमत
    4. बोकडाची किंमत
    5. वाहतूक खर्च
    6. चारा लागवडी करीता क्षेत्र
    7. कडबाकुट्टी यंत्र
    8. सायलेज मशीन
    9. उपकरणे
    10. विमा
    11. इतर आवश्यक साहित्य

  36. वराह पालनाद्वारे उद्योजकता विकास अंतर्गत अनुदानासाठी पात्र वस्तू
    1. शेडचे बांधकामवराह मादी
    2. शेडचे बांधकाम वराह नर
    3. फॅरोइंन्गपेन
    4. डुकरांची पिल्ले साठी शेडचेबांधकाम
    5. स्टोअररूम
    6. गिल्ट 50 किलो (१००)
    7. उपकरणे
    8. विमा
    9. पशुवैद्यकीय मदत

  37. वैरण विकास अंतर्गत उद्योजकता अनुदानासाठी पात्र वस्तू –
  38. मुरघास प्रकल्प –

    शेड व गोडाउनचे बांधकाम

    1. बेलींग
    2. हार्वेस्टर
    3. पॉवर ऑपरेटेड कडबा कटर
    4. इन्स्टॉलेशन कॉस्ट ऑफ प्लांट अॅड मशिनरी
    5. मशिनरी ठेवण्यासाठी शेड

    फॉडर ब्लॉक मेकिंग युनिट

    1. एल डी-एच डी कटींग वीथ इलेक्ट्रीक स्टार्टर, पॅनल बोर्ड, व्ही-बेल्ट, पुली इतर.
    2. एच डी- एल डी मिक्सर वीथ इलेक्ट्रीक मोटर,
    3. डेन्सीफाईड टीएमआर ब्लॉक मेकर वीथ इलेक्ट्रीक मोटर स्टार्टर, हायड्रॉलीक ऑइल, कुलींग सिस्टीम
    4. प्लॅटफॉर्म इलेक्ट्रॉनिक वजन काटा
    5. मेन कंट्रोल पॅनल कंप्लीट वीथ टारटार कॉन्ट्रॅक्टर, रिले मीटर, कंडुट्स, फिटींग्स, केबल ट्रे
    6. स्तीचींग मशिन डबल थ्रेड
    7. मोलासेस स्टोरेज टॅंक ओएच मोलासेस टॅंक कपॅसीटी
    8. ग्रांडींग सेक्शन फीटेड विथ एलीव्हेटर मोटर कनेक्टींग पीस ऑफ मॅग्नेट. बीन फॉर ग्रांडेबल्स इन एम एस हॅंडल ऑपरेटेड, हॅमर मीलसर्कल वीठ सीव्ह अॅड कंप्लीट वीठ फाउंडेशन फीटेड वीठ मोटर अॅड ड्रॅव पार्ट्स.
    9. मिक्सींग सेक्शन फिटेड विथ ग्राउंड मटेरियल लिफ्टींग एलीव्हेटर वीथ डिसचार्ग वीथ मोटर अॅड कनेक्टींग पीस ऑफ मॅग्नेट बीन अबाव्ह बॅच मीक्सर वीथ डिसचार्ग कंट्रोल. पॅडल ताइप बॅच मिक्सर वीथ एम एस कन्सट्रक्शन फिटेड वीथ मोटर.
    10. पॉवर सप्लाय
    11. शेड मशिनरीसाठी
    12. कच्चा माल ठेवण्यासाठी शेड